ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षांची याचिका कोर्टाने केली मान्य, मुस्लीम पक्षकारांची मागणी फेटाळली, पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला होणार

| Updated on: Sep 12, 2022 | 4:00 PM

कोर्टाच्या निर्णयावेळी हिंदू पक्षकारांचे वकील हरीशंकर जैन आणि विष्णू शंकर जैन हे कोर्टात उपस्थित होते. तर मुख्य याचिकाकर्त्या राखी सिंह या कोर्टात उपस्थित नव्हत्या. एकूण 62 जणांना कोर्टात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षांची याचिका कोर्टाने केली मान्य, मुस्लीम पक्षकारांची मागणी फेटाळली, पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला होणार
कोर्टाचा निर्णयानंतर पुढे काय?
Follow us on

वाराणसी- संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षकारांची भूमिका योग्य असल्याचा निष्कर्ष वाराणसी हायकोर्टाने काढला आहे. मुस्लीम पक्षकारांची या प्रकरणी सुनावणी न करण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी सांगितले की, कोर्टाने हिंदू पक्षकारांची बाजू मान्य केली आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी उपस्थित केलेले आपत्तीचे मुद्दे फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणी आता 22 सप्टेंबरला कोर्टाने पुढील सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

निर्णय आजपर्यंत सुरक्षित ठेवला होता

कोर्टाच्या निर्णयावेळी हिंदू पक्षकारांचे वकील हरीशंकर जैन आणि विष्णू शंकर जैन हे कोर्टात उपस्थित होते. तर मुख्य याचिकाकर्त्या राखी सिंह या कोर्टात उपस्थित नव्हत्या. एकूण 62 जणांना कोर्टात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात श्रृगंरा गौरी मंदिरात पूजा करण्यास अनुमती देणाऱ्या याचिकेवर 24 ऑगस्ट रोजी हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. यानंतर वाराणसी जिल्हा न्यायाधीश ए के विश्वेश यांनी 12 सप्टेंबर पर्यंत या प्रकरणात निर्णय सुरक्षित ठेवला होता.

शहरात हायअलर्ट

वाराणसीचे पोलीस आयुक्त ए सतीश गणएश यांनी निर्णयापूर्वी सांगितले होते की, शहारातील संवेदनशील परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. शहरात हिंदू आणि मुस्लीम यांनी संमिश्र वस्ती असलेल्या परिसरात पोलीस बंजोब्सत तैनात करण्यात आला आहे. रात्रीच्या गस्तीतही वाढ करण्यात आलेली आहे. आदेशानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नेय यासाठी हे उपाय करण्यात आले होते.