आम आदमी पक्ष सोडताच हरभजन सिंगला सर्वात मोठा झटका… पंजाब सरकारचा मोठा निर्णय; आता फक्त…

Harbhajan Singh Security AAP: आम आदमी पक्षातील फूट अनपेक्षित नसली तरी त्यातील काही चेहऱ्यांनी अरविंद केजरीवला यांना मोठी बोचणा लावली. या चेहऱ्यात हरभजन सिंग हा सुद्धा आहे. राज्यसभेत त्यामुळे गणितं पालटतील. सत्ताधारी पक्ष मजबूत होईल. त्याचवेळी आपने मोठा निर्णय घेत हरभजन सिंगला झटका दिला आहे.

आम आदमी पक्ष सोडताच हरभजन सिंगला सर्वात मोठा झटका... पंजाब सरकारचा मोठा निर्णय; आता फक्त...
हरभजन सिंहला झटका
| Updated on: Apr 26, 2026 | 11:52 AM

Harbhajan Singh Security AAP: आम आदमी पार्टीच्या अंतर्गत मोठा विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. गेल्या दोन वर्षांपासून या पक्षावर भाजपची वक्रदृष्टी कमी झालेला नाही. यावेळी भाजपने वेळीच आणि अचूक घाव घातला. आपचे सात खासदार फोडले. राज्यसभेत सत्ताधारी मजबूत स्थितीत येतील. पंजाबच्या भगवंत मान सरकारने या दरम्यान माजी क्रिकेटर आणि राज्यसभेतील खासदार हरभजन सिंह याची सुरक्षा मागे घेतली आहे. आपची साथ सोडून भाजपच्या गोटात जात असल्यानेच मान सरकारने हा निर्णय घेतला आहे. या राजकीय घडामोडींमुळे पंजाबसह दिल्लीत राजकीय भूकंप झाला आहे.

सुरक्षा व्यवस्था घेतली काढून

हरभजन सिंह यांचे खासगी सहाय्यक, पीए. मानदीप सिंह यांनी सांगितले की, पंजाब सरकारने अचानक कारवाई केली. भज्जीची सर्व सुरक्षा मागे घेण्यात आली. माहितीनुसार, हरभजन सिंह यांच्या घराबाहेर तैनात जवळपास 9 ते 10 सुरक्षा कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले आहे. तर सरकारने दिलेली पायलट कारही मागे घेतली आहे. राघव चड्ढा यांनी आपमधून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आम आदमी पक्षाचे 10 राज्यसभेचे खासदार आहेत. त्यातील 7 जणांनी भाजपशी संपर्क साधला आहे. या 7 जणांमध्ये हरभजन सिंह यांचेही नाव समोर आले आहे. या सर्व घटनाक्रमावर भज्जीने अद्याप मौन बाळगले आहे. पण सरकारने सुरक्षा काढल्याने थेट नाराजी दिसून आली आहे.

पंजाबचा गद्दार

यापूर्वी शनिवारी हरभजन सिंग याच्या घराबाहेर आप कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला. त्याच्या घराबाहेर पंजाबचा गद्दार असे भिंतीवर लिहिण्यात आले. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आप कार्यकर्ते त्याच्यावर भडकलेले दिसले. यावेळी पोलिसही होते. पण संतप्त कार्यकर्ते कुणालाही जुमानत नसल्याचे दिसले. शनिवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून पक्ष फुटीचा निषेध केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्ष सोडणारे खासदार गद्दार असल्याचा तिखट हल्लाबोल केला. या नेत्यांनी केवळ पक्षाचाच नाही तर पंजाबच्या जनतेचे विश्वासघात केल्याचा तिखट प्रहार त्यांनी केला. यावेळी मान यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काही लोक गेल्याने आप पक्ष कमकुवत होईल हा भाजपचा भ्रम असल्याचे ते म्हणाले.

Follow Us