पत्नी भाजपात, वडील आणि बहीण काँग्रेसमध्ये, जाडेजाचं समर्थन कुणाला?

पत्नी भाजपात, वडील आणि बहीण काँग्रेसमध्ये, जाडेजाचं समर्थन कुणाला?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा भारतीय जनता पक्षाला समर्थन देणार आहे. भाजपचं समर्थन करत असल्याचं रवींद्र जाडेजानं ट्विटरवरुन स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, रवींद्र जाडेजाची पत्नी भाजपमध्ये असली, तरी त्याचे वडील आणि बहीण काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत.


“माझा पाठिंबा भाजपला, जय हिंद”, असं ट्वीट जाडेजाने केलं. या ट्वीटमध्ये जाडेजाने त्याची पत्नी रिवाबाचं हॅशटॅग वापरलं आहे. सोबतच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केलं. जाडेजाने भाजपच्या चिन्हाचा फोटोही शेअर केला.

रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वीच जाडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाडेजा कुटुंबात दोन पक्ष आमने-सामने आहेत. भाजपला जाहीरपणे पाठिंबा दिल्यानंतर, आपण पत्नीसोबत भाजपच्या समर्थनात असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

गेल्यावर्षी रवींद्र जाडेजा आणि रिवाबा जाडेजा यांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीमध्ये भेट घतेली होती. या भेटीचा फोटो पंतप्रधानांनी ट्वीट केला होता. “क्रिकेटर रवींद्र जाडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांच्याशी खूप चांगला संवाद झाला”, असे पंतप्रधानांनी लिहिले होते.

रवींद्र जाडेजा हा गुजरातचा आहे. गुजरात राज्यात लोकसभेच्या एकूण 26 जागा आहेत. तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला गुजरातमध्ये मतदान पार पडणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *