देशात आता नाकावाटे कोरोना लस देणार; ‘या’ कंपनीच्या लसीला मिळाली परवानगी

| Updated on: Sep 06, 2022 | 6:44 PM

हैदराबादस्थित कंपनी भारत बायोटेकने 4,000 व्हॉलेंटियर्सवर नाकातील लसीच्या क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत. यापैकी कोणावरही दुष्परिणाम दिसला नाही. ऑगस्टमध्ये तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीनंतर, हे स्पष्ट झाले की BBV154 लस वापरासाठी सुरक्षित आहे.

देशात आता नाकावाटे कोरोना लस देणार; या कंपनीच्या लसीला मिळाली परवानगी
देशात आता नाकावाटे कोरोना लस देणार
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेला आता आणखी गती मिळणार आहे. या मोहिमेला ‘बुस्टर डोस’ देणारी नवीन खूशखबर मिळाली आहे. देशात नाकावाटे दिल्या जाणार्‍या पहिल्या कोरोना प्रतिबंधक लसीला डीसीजीआय (DCGI)कडून परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने ही लस विकसित केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज भारत बायोटेकच्या पहिल्या नोजल (Nozzle) कोरोना प्रतिबंधक लसीची खूशखबर ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ही लस 18 वर्षांपुढील वयोगटातील नागरिकांना दिली जाणार आहे.

दोन प्रकारच्या लस केल्या विकसित

भारत बायोटेकच्या या नोजल लसीची तिसर्‍या टप्प्यातील तसेच बुस्टर डोसची चाचणी गेल्या महिन्यात पूर्ण करण्यात आली होती. कंपनीने दोन प्रकारच्या लसी विकसित केल्या असून पहिला डोस हा नियमित लस म्हणून वापरला जाणार आहे. तसेच दुसरा डोस हा बुस्टर डोस रुपात वापरण्यास परवानगी मिळाली आहे.

या लसीमुळे देशाचा कोरोनाविरोधी लढा आणखी बळकट होणार आहे. भारताच्या कोरोनाविरोधी लढ्याला मिळालेले हे मोठे यश असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

4 हजार लोकांवर ट्रायल

हैदराबादस्थित कंपनी भारत बायोटेकने 4,000 व्हॉलेंटियर्सवर नाकातील लसीच्या क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत. यापैकी कोणावरही दुष्परिणाम दिसला नाही. ऑगस्टमध्ये तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीनंतर, हे स्पष्ट झाले की BBV154 लस वापरासाठी सुरक्षित आहे.

BBV154 बाबत, भारत बायोटेकने सांगितले की, ही लस नाकातून दिली जाते. तसेच ही लस किफायतशीर आहे जी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी योग्य असेल. या लसीमुळे संसर्ग आणि संक्रमण कमी होईल असे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत देशात 213 कोटींहून अधिक लसीकरण

भारतात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोविडचे 4,417 नवीन रुग्ण आढळले आहेत. भारतात सध्या कोविडचे 52,336 सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक (5,28,030) मृत्यू झाले आहेत. कोविडचा पराभव करण्यासाठी कोविड लसीकरणावरही भर दिला जात आहे. आतापर्यंत देशात 213 कोटींहून अधिक (2,13,72,68,615) कोविड लस देण्यात आल्या आहेत. (DCGI approves the first nozzle corona vaccine in the country)