गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी भारतात विकसित झालेल्या लसीला सरकारची मान्यता

भारतात 15 ते 44 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक वारंवार होणाऱ्या कर्करोगाचे (Cancer) प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये भारत हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सापडणाऱ्या रुग्णांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी भारतात विकसित झालेल्या लसीला सरकारची मान्यता
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी भारतात विकसित झालेल्या लसीला सरकारची मान्यता
| Updated on: Jun 15, 2022 | 11:30 PM

नवी दिल्लीः भारतात 15 ते 44 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक वारंवार होणाऱ्या कर्करोगाचे (Cancer) प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये भारत हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सापडणाऱ्या रुग्णांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. DCGI  (Drugs Controller General of India) म्हणजेच भारताचे ड्रग्ज कंट्रोलरच्या विषय तज्ज्ञ समितीकडून बुधवारी सीरम इन्स्टिट्यूटच्या स्वदेशी विकसित केलेल्या क्वाड्रिव्हॅलंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (qHPV) या लसीची शिफारस करण्यात आली आहे. ही लस 9 ते 26 वर्षे वयोगटातील गर्भाशयाचा कर्करोगाच्या रूग्णांसाठी तयार करण्यात आली आहे.

 

देशातील रुग्णांसाठी लवकर उपलब्ध

एसआयआयमधील संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी 8 जून रोजी भारतातील औषध नियंत्रक जनरल (DCGI) कडे qHPV च्या अधिकृततेसाठी त्यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्याने टप्पा 2/3 क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्यानंतर याची खात्री करण्यासाठी देशातील रुग्णांसाठी ती लवकर उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले आहेत.

अधिकृतता देण्याची शिफारस

या लसीच्या अधिकृततेसाठी सीडीएससीओच्या कोविड-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) बुधवारी त्यांच्या अर्जावर चर्चा आणि विचार विनिमय करुन हा निर्णय देण्यात आला आहे.यावेळी वेगवेगळ्या त्याच्य टेस्टही करण्यात आल्या आहेत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध क्यूएचपीव्ही तयार करण्यासाठी इन्स्टिट्यूटकडून बाजार अधिकृतता देण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.