AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान

दिल्लीत कालच्या आंदोलनला हिंसक वळण लागलं होतं. या आंदोलनात 100 हून पोलीस कर्मचारी जखमी झाले.

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान
| Updated on: Jul 21, 2026 | 7:33 AM
Share

भारताची राजधानी दिल्लीत सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळल्याचे दिसून आलं. या ‘संसद मार्च’मध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष दिसून आला. जंतर-मंतरवरून आंदोलक संसदेच्या दिशेने निघताच पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. कालच्या आंदोलनातील या संघर्षात 100 हून अधिक पोलीस आणि आंदोलक जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे.

दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यानंतरही आंदोलक संसदेच्या दारात पोहोचले. आंदोलकांनी बॅरिकेट्स देखील तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला. आंदोलकांनी दगडफेक केली. सरकारी वाहनांची नासधूस केली, असा गंभीर आरोप देखील पोलिसांनी केला. कालच्या आंदोलनामुळे 118 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यात अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासहित इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत. यात अनेक महिला पोलीस अधिकारी देखील जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 60 आंदोलक देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलीस अधिकाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आंदोलनादरम्यान सरकारी वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत 70 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीत कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या लाठीचार्जवरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे.

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘संसद मार्च’दरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या मोर्चाच्या हिंसाचारामागे कोणाचं षडयंत्र होतं का, याचाही तपास पोलीस करणार आहेत. पोलिसांनी 70 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. विविध परिसरातून आलेल्या तक्रारीवरूनही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आज मंगळवारी देखील आंदोलन करण्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे आज पोलीस कोणती भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...