AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार आंदोलन झालं. या आंदोलनात देशभरातील तरुणांनी सहभाग घेतला होता. तरुणांनी संसदेच्या दिशेने कूच केल्यानंतर आंदोलन अधिकच चिघळलं.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार
Ashutosh RankaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 12:00 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतरमंतरवर आज दिवसभर जोरदार आंदोलन झालं. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी कॉकरोच जनता पार्टीने उग्र आंदोलन केलं. तरुणांनी संसदेकडे कूच करताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संध्याकाळपर्यंत जंतरमंतर मैदान खाली झालं. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाऊन आंदोलन धरणे आंदोलन सुरू केलं. जंतरमंतरवर अजूनही आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही, असा पवित्राच आंदोलकांनी घेतल्याने वातावरण पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जंतरमंतरवर शेकडो तरुण टॉर्च घेऊन ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलकांना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. आम्ही येथे ठामपणे उभे आहोत आणि अधिक आंदोलक आमच्यात सहभागी होण्याची वाट पाहत आहोत, असे सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले.

मैदानात या…

अनेक लोक आसपास आहेत. सर्वांना आवाहन करतो तुम्ही सर्वांनी या ठिकाणी या. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आपल्याला मैदान सोडायचं नाहीये, असं आशुतोष रांका यांनी सांगितलं. तसेच हे आंदोलन सातत्याने चालू राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे आंदोलक रात्रभर जंतरमंतरवर राहणार आहेत. त्यामुळे सकाळी ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सकाळी आंदोलक पुन्हा आंदोलन करणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आंदोलन चिघळलं

दरम्यान, आज दिवसभर जंतरमंतरवर मोठा हंगामा झाला. आंदोलकांनी संसदेच्या दिशेने कूच केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यामुळे वातावरण चिघळलं. आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...