AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest Delhi LIVE : तोपर्यंत मागे हटणारच नाही; आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर

| Edited By: | Updated on: Jul 20, 2026 | 11:50 PM
Share

CJP Protest Delhi LIVE Updates in Marathi : दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून सुरु असलेलं आंदोलन चिघळत चाललं आहे. आंदोलक संसद भवनाच्या जवळ पोहोचले आहेत. पोलिसांनी अश्रुधराच्या नळकांड्या फोडल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.

CJP Protest Delhi LIVE : तोपर्यंत मागे हटणारच नाही; आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर
cjp protest

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Jul 2026 09:01 PM (IST)

    सरकार विद्यार्थ्यांना घाबरतं का? ही कसली लोकशाही? ममता बॅनर्जींची टीका

    तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरही त्यांनी टीका केली. हे सरकार विद्यार्थ्यांशी घाबरता का? ही कसली लोकशाही आहे? असे सवालही त्यांनी केले.

  • 20 Jul 2026 08:46 PM (IST)

    सोमन वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, नागपुरात आंदोलन

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन मोर्चा काढला. या मोर्चात ‘नीट’ पेपरफुटी , शिक्षणातील गोंधळ, राम मंदिर चोरीसह स्थानिक प्रश्नांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  जंतर-मंतरवरील आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासही यावेळी पाठिंबा देण्यात आला.

  • 20 Jul 2026 08:18 PM (IST)

    दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ मीरा भाईंदर शहरात निदर्शने

    दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता मीरा-भाईंदर शहरात पोहोचले आहेत. मीरा रोड येथील शहीद कौस्तुभ राणे चौकात विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने घोषणाबाजी करत केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी केली.

  • 20 Jul 2026 08:03 PM (IST)

    आमचे आंदोलन सुरूच राहणार, अभिजित दीपके यांची घोषणा

    कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीमध्ये आंदोलन सरू आहे. हजारो तरुण दिल्लीमध्ये जमा झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचे पत्र केंद्र सरकारला दिले आहे. दरम्यान, आमचे आंदोलन सुरूच राहील असे सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी जाहीर केले आहे.

  • 20 Jul 2026 07:54 PM (IST)

    माहिम पोलीस स्टेशनबाहेर CJPचे कार्यकर्ते जमले

    माहिम पोलीस स्टेशनबाहेर सीजेपीचं आंदोलक जमले आहेत. आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या समर्थनार्थ सीजेपी कार्यकर्ते जमले आहेत.

  • 20 Jul 2026 07:50 PM (IST)

    एनडीएची ‘मंगल मिलन’ सभा उद्या सकाळी 9.30 वाजता

    एनडीए संसदीय पक्षाची बैठक उद्या सकाळी 9:30 वाजता होणार आहे. या बैठकीला ‘मंगल मिलन’ असे नाव देण्यात आले आहे. या बैठकीत, पश्चिम बंगाल आणि आसाममधील विजयाबद्दल एनडीएच्या मित्रपक्षांकडून पंतप्रधान मोदींचा सत्कार केला जाईल. पंतप्रधान भाषणही करणार आहेत.

  • 20 Jul 2026 07:42 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालय पुढील सोमवारी देणगी चोरीच्या प्रकरणाची सुनावणी घेणार

    राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाची सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या सोमवारी होईल.

  • 20 Jul 2026 07:26 PM (IST)

    संत परंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा- फडणवीस

    संत परंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. गंगाखेड, अमरावती, काटोल तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना त्यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे 115 कोटींच्या विकासकामांना गती मिळणार आहे. आराखड्यातील कामे दर्जेदार आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करा असा आदेशही त्यांनी दिला आहे.

  • 20 Jul 2026 07:18 PM (IST)

    दिल्ली उच्च न्यायालय उद्या सोनम वांगचुक प्रकरणाची सुनावणी करणार

    दिल्ली उच्च न्यायालय सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन मेदांता रुग्णालयात हलवण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने सोनम वांगचुक यांचे सर्व अहवाल आणि त्यांच्या डॉक्टरांना बोलावले आहे.

  • 20 Jul 2026 07:07 PM (IST)

    सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू ठेवण्याची केली घोषणा

    विद्यार्थ्यांना संसद भवनात खासदारांची भेट घेण्याची परवानगी द्या, असं सोनम वांगचूक यांनी सांगितलं आहे. सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांनी संयम आणि अहिंसेचा मार्ग कायम ठेवावा, असं आवाहनही त्यांनी केली आहे.

  • 20 Jul 2026 07:04 PM (IST)

    पंतप्रधान मोदी तरुणविरोधी आहेत: राहुल गांधी

    राहुल गांधी यांनी पेपरफुटी आणि एसजेपीच्या आंदोलनासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात युवा-विरोधी पंतप्रधान आहेत. इतके युवा-विरोधी की, ते एका अयशस्वी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामादेखील सक्तीने घेऊ शकत नाहीत.”

  • 20 Jul 2026 05:54 PM (IST)

    CJP Protest In Delhi : दिल्ली पोलिसांकडून आंदोलक आणि नागरिकांसाठी अधिसूचना जारी

    दिल्ली पोलिसांनी आंदोलक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना (ॲडव्हायजरी) जारी केली आहे. यात दिल्ली पोलीसांनी सर्व आंदोलकांना संयम बाळगण्याचे आणि शांतता तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे केले आहे, सर्व आंदोलकांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करावे. कोणत्याही बेकायदेशीर किंवा हिंसक कृतीत सहभागी होऊ नये आणि कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर सूचनांचे पालन करावे अशा सूचना केल्या आहेत. तसेच, सर्वसामान्य नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा, दिशाभूल करणारी किंवा अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ती पुढे प्रसारित करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.

  • 20 Jul 2026 05:40 PM (IST)

    CJP Protest Delhi LIVE : मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – धर्मराज दानवे

    शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना मराठवाडा प्रमुख यांनी सीजीपीच्या आंदोलनाबाबत बोलताना म्हटले की, ‘दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनास आमचा पाठींबा आहे. तसेच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

  • 20 Jul 2026 05:24 PM (IST)

    सांगली : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुरोगामी संघटनेचे आंदोलन

    नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीत आंदोनल सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून सांगलीत पुरोगामी संघटनेच्या वतीने स्टेशन चौकात गांधीजींच्या पुतळ्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्ते आणि तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 20 Jul 2026 05:08 PM (IST)

    सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; धाराशिवमध्ये तरुण रस्त्यावर

    सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धाराशिवमध्ये विविध युवक संघटना व तरुणांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत केंद्रातील आणि राज्यातील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

  • 20 Jul 2026 04:53 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेचे आंदोलन, सीजेपीला पाठिंबा

    दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदोलनात पथनाट्य सादर करण्यात आले आहे

  • 20 Jul 2026 04:50 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांचा काही संबंध नाही- सदाभाऊ खोत

    झुरळं पार्टीच आंदोलन आहे. परीक्षेत घोटाळे झाले. त्यामध्ये सीबीआय चौकशी सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा याचाशी संबंध नाही. चौकशीत असं कुठे आलेल नाही. आता मोदींचा राजीनामा घ्या म्हणत आहेत. याचा अर्थ याच्यामागे कुणी तरी आहे. सोनम वांगचुक यांना शहीद करायचं होतं. राज्यातील सर्व पक्ष रिकामटेकडे आहेत असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

  • 20 Jul 2026 04:40 PM (IST)

    अभिनेता प्रकाश राज सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर

    प्रकाश राज कालपासूनच जंतरमंतरवर आहेत. साधा टीशर्ट अंगात घालून ते आले आहेत. रात्री ते सामान्य नागरिकांसारखेच स्टेजवर झोपले. कोणताही बडेजाव नाही. स्टारडमचा आव नाही. सामान्य माणसासारखं ते आंदोलक झाले होते. काल संध्याकाळी त्यांनी तरुणांशी संवाद साधला. सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. आज सकाळाही त्यांनी तरुणांशी संवाद साधला. जेव्हा तरुण आक्रमक झाले तेव्हाही प्रकाश राज तरुणांच्या पाठी होते. तरुणांवर हल्ला न करण्याचं आवाहन करत होते.

  • 20 Jul 2026 04:21 PM (IST)

    अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यातील बैठक संपली

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यातील बैठक संपली आहे. ही बैठक जवळपास तासभर चालली. सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली आहे.

  • 20 Jul 2026 04:15 PM (IST)

    चैत्यभूमी परिसरात CJPचं आंदोलन, आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

    दिल्लीनंतर मुंबईतील चैत्यभूमी परिसरात सीजेपीचं आंदोलन पाहायला मिळत आहे. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरु आहे.

  • 20 Jul 2026 03:57 PM (IST)

    आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज

    नवी दिल्ली सुरु असणाऱ्या CJP च्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला आहे. या लाठीचार्जचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • 20 Jul 2026 03:48 PM (IST)

    अरविंद सावंत सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी रवाना

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संजय राऊत यांच्या नेतृत्वात अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी सफदरजंग रुग्णालयाकडे रवाना.

  • 20 Jul 2026 03:40 PM (IST)

    दिल्लीतील आंदोलनावर अभिजीत दिपके यांच्या काकांची प्रतिक्रिया

    भाजप सरकारने अभिजीत दिपके आणि वांगचुक यांची नाराजी केली. अभिजीत दिपके यांच्या काकांची प्रतिक्रिया. अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉक्रोज जनता पार्टीचे एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू , आंदोलनात अभिजीत दिपके यांचे काका / काकू यांच्यासह काँग्रेस, UBT शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सहभागी..

  • 20 Jul 2026 03:31 PM (IST)

    लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित

    दिल्लीतील CJP च्या आंदोलन मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून संसदेचे सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. अशातच आता लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे.

  • 20 Jul 2026 03:18 PM (IST)

    सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अंबाजोगाईत लॉंगमार्च

    लडाखच्या पर्यावरण आणि घटनात्मक संरक्षणासाठी लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि देशातील शैक्षणिक गोंधळाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज अंबाजोगाईत ‘सजग अंबाजोगाईकरांच्या’ वतीने भव्य लॉंगमार्च काढण्यात आला. या आंदोलनात शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंबाजोगाई येथील नगर परिषद मैदानात आंदोलक एकत्र आले.

  • 20 Jul 2026 03:07 PM (IST)

    दुहेरी हत्याकांडाने नाशिक पुन्हा हादरले

    नाशिकच्या नाशिकरोड जेलरोड मध्ये धक्कादायक घटना. पतीने पत्नीचा आणि मुलाचा खून करत स्वतः विषारी औषध सेवन करून केला आत्महत्येचा प्रयत्न. पतीला तत्काळ नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात हलविले; पतीवर उपचार सुरू पतीची प्रकृती चिंताजनक. ब्लेड सदृश चाकूने पत्नीवर आणि मुलाच्या गळ्यावर वार करत पतीने केला निर्घुण खून. खुनाचे कारण अस्पष्ट नाशिकरोड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू

  • 20 Jul 2026 03:01 PM (IST)

    प्रकाश राज यांना ट्रकमधून बाहेर काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न

    प्रकाश राज यांना ट्रकमधून बाहेर काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु झाला आहे. CJP चे शिष्टमंडळ जे.पी. नड्डा यांच्यात भेटीला गेल्यानंतर आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

  • 20 Jul 2026 02:54 PM (IST)

    पोलिसांकडून गाडीच्या टायरमधील हवा काढण्याचा प्रयत्न

    पोलिसांकडून गाडीच्या टायरमधील हवा काढली जात आहे. पण तरीही आंदोलन काही थांबवले जात नाहीये. या गाडीमध्ये अभिजीत दिपके, सोनम वांगचुक यांची पत्नी गितांजली ओघ आणि प्रकाश राज आहेत, प्रकाश राज बिनधास्त गाडीच्या वर उभे राहून या आंदोलनाचे नेतृत्त्व करताना दिसत आहेत.

  • 20 Jul 2026 02:45 PM (IST)

    CJP च्या मागण्यांचे पत्र जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर

    आमच्या मागण्यांचे पत्र नड्डा यांना दिले. यात प्रमुख मागणी ही धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनाम्याची होती. परिक्षा पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबाला मदत द्यावी. अस पत्र नड्डा यांना दिले ही माहिती CJP च्या शिष्टमंडळाने सांगितली. या शिष्टमंडळात सौरभ दास हे होते.

  • 20 Jul 2026 02:39 PM (IST)

    CJP शिष्टमंडळ आणि जे. पी. नड्डा यांच्यात 10 मिनिटांची चर्चा

    CJP शिष्टमंडळ आणि जे. पी. नड्डा यांच्यात 10 मिनिटांची चर्चा पार पडली आहे. दोन तास वाट बघितल्यानंतर फक्त 10 मिनिटांची चर्चा झाली असे सीजीपेकडून विधान समोर आले आहे.

  • 20 Jul 2026 02:36 PM (IST)

    सोनम वांगचुक यांची पत्नी गितांजली वांगचुक यांची प्रतिक्रिया समोर

    सोनम वांगचुक यांच्या पत्नी यांनी आंदोलकांना एक संदेश दिला आहे, त्या म्हणाल्या की, ” विद्यार्थ्यांनी शांतपूर्वक आंदोलन करत आहे. सरकार आणि पोलिसचं आक्रमक होत आहे. सरकार आणि पोलिस आक्रमक असूनही विद्यार्थी शांतपणे सहकार्य करत आहे हाच आमचा विजय आहे.”

  • 20 Jul 2026 02:30 PM (IST)

    संसदेकडे जाण्यासाठी असलेले सहाही मार्ग आता बंद करण्यात आले

    संसदेकडे जाण्यासाठी साधारणत: सहा मार्ग आहेत. आता हे सर्व गेट बंद करण्यात आले आहे. या गेटच्या परिसरामध्ये जवळपास 150 ते 200 मीटर अंतरावर बॅरिगेट्स लावण्यात आले आहे. जे महत्त्वाचे मार्ग आहेत जिथून खासदार संसदेमध्ये येत असतात त्या मार्गावर आता आणखी बंदोबस्त वाढवला आहे.

  • 20 Jul 2026 02:18 PM (IST)

    काही आंदोलक संसदपासून 150 मीटर अंतरावर पोहोचले

    संसद भवनातील सुरक्षा वाढवली आहे. संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार बंद केले. बॅरिकेट्स पाडण्याचा प्रयत्न हा आंदोलकांकडून सुरुच आहेच. आंदोलक खूपच आक्रमक झालेले आहेत. तर पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. संसदपासून 150 मीटर अंतरावर आंदोलक पोहोचले आहे.

  • 20 Jul 2026 02:12 PM (IST)

    अखिलेश यादव यांचा सरकारवर हल्लाबोल

    अखिलेश यादव यांनी सरकारवर हल्लाबोल करत म्हटले, “तुम्ही नोकऱ्या किंवा रोजगार दिला नाही. जर नोकऱ्या दिल्या असत्या, तर मुले रस्त्यावर उतरली असती का? सध्याचा मुख्य प्रश्न हा आहे की नीट (NEET) विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे… जेव्हा लोक आंदोलन करायचे, तेव्हा ब्रिटिश खरोखरच त्यांचे ऐकून घ्यायचे. म्हणूनच आज जगभरात गांधीजींचा आदर केला जातो. त्यांनी आंदोलनाचा मार्ग दाखवला. ज्या प्रकारे ते आंदोलकांना हटवत आहेत – आशा आहे की सरकारला शेवटी ‘सन्माननीय निरोप’ मिळणार नाही.”

  • 20 Jul 2026 02:05 PM (IST)

    CJP Protest Delhi LIVE : आंदोलक आक्रमक, बॅरिकेडस आंदोलकांनी तोडले

    आंदोलकांना संसद भवनात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. केरळ भवन परिसरात अभिजीत दीपके त्याच्या सहकाऱ्यांना अडवलं आहे. बॅरिकेडस मोडून पुढे जाण्याचा आंदोलक प्रयत्न करत आहेत. आंदोलकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

  • 20 Jul 2026 02:00 PM (IST)

    मुंबईत जमावबंदी लागू

    मुंबईत पुढील 15 दिवसासाठी जमावबंदी लागू करण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यास आले आहे. 23 जुलैपासून 03 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली आहे.

  • 20 Jul 2026 01:53 PM (IST)

    CJP Protest Delhi LIVE : बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न

    संसद भवनाच्या 150 मीटर अंतरापर्यंत आंदोलक पोहोचले आहेत. बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिस बळाचा वापर करत आहे. जमावाला हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लाठीचार्ज झाला आहे. निमलष्करी दल त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • 20 Jul 2026 01:50 PM (IST)

    CJP Protest Delhi LIVE : परिस्थिती चिघळली, आंदोलक संसद भवनापासून फक्त 150 मीटर अंतरावर

    नवीन संसद भवनाला सहागेट आहेत. संसद भवनाच्या 150 मीटर अंतरापर्यंत आंदोलक पोहोचले आहेत. त्यांना तिथे रोखण्यात आलं आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप सुरु आहे.

  • 20 Jul 2026 01:42 PM (IST)

    CJP Protest Delhi LIVE : संसद भवन परिसराला पोलीस छावणीच स्वरुप

    आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मानवी साखळी बनवली. काहीही झालं तरी आंदोलक यापुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण संसद भवन परिसराला पोलीस छावणीच स्वरुप आलं आहे. संसदकडे जाणाऱ्या सहाही मार्गावर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  • 20 Jul 2026 01:34 PM (IST)

    Cjp Protest Live : संसद भवनाच्या परिसरापर्यंत आंदोलक पोहोचले होते

    संसद भवनाच्या परिसरापर्यंत आंदोलक पोहोचले होते. आंदोलक अद्यापही आंदोलनावर, मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. जेपी नड्डा यांच्याकडून चर्चेसाठी बोलवण्यात आल्याच सीजेपीकडून सांगण्यात आलं. पण विषय शिक्षण मंत्र्यांचा चर्चेसाठी बोलवतात आरोग्य मंत्री अशी टीका होत आहे.

  • 20 Jul 2026 01:33 PM (IST)

    Cjp Protest Live : डिंपल यादव यांना ताब्यात घेतलं

    डिंपल यादव यांना ताब्यात घेतल्याचं समाजवादी पार्टीकडून सांगण्यात आलं. अजूनही काही नेत्यांना ताब्यात घेतल्याचं समाजवादी पार्टीकडून सांगण्यात येत आहे.

  • 20 Jul 2026 01:26 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला

    हजारोंच्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तरुण आक्रमक झाले आहेत. संसद भवनाच्या परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.

  • 20 Jul 2026 01:25 PM (IST)

    Cjp Protest : संसद भवनाचे सर्व दरवाजे बंद, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

    दिल्लीत परिस्थिती चिघळली आहे. संसद भवनाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत.

  • 20 Jul 2026 01:24 PM (IST)

    आंदोलकांवर पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

    आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या  आहेत. काही आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

  • 20 Jul 2026 12:59 PM (IST)

    कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन ही नौटंकी – चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

    कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन ही नौटंकी  आहे अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडला का ? पेपरफुटीवरून विरोधकांकडून राजकारण सुरू आहे,  अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं.

  • 20 Jul 2026 12:48 PM (IST)

    यवतमाळ शहरा लगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेचा काही भाग कोसळला

    यवतमाळ- यवतमाळ शहरा लगत असलेल्या लोहारा कोलाम पौड जिल्हा परिषद शाळेचा काही भाग कोसळला. जीर्ण झालेल्या शाळेचा एका बाजूचा पिलर कोसळला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही वा कोणीही जखमी झालं नाही.  शाळा जीर्ण असल्याने बाजूला विद्यार्थी प्रार्थना करत होते , पण त्याच वेळी इमारतीचा काही भाग कोसळला.  जिल्हा परिषद शाळेचा निर्लेखन अहवाल देऊन ही अद्याप कारवाई झालेली नाही.

  • 20 Jul 2026 12:33 PM (IST)

    जंतर मंतर परिसरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प

    कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवर धडक मोर्चा, जंतर मंतरवर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.  जंतर मंतर परिसरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

  • 20 Jul 2026 12:23 PM (IST)

    वाशिमच्या मसला पेन परिसरातील साई मंदिरात चोरी, दानपेटी तोडून रक्कम लंपास

    वाशिमच्या मसला पेन परिसरातील साई मंदिरात चोरी झाली.  मंदिराचे कुलूप तोडून चोरट्याने प्रवेश केला आणि दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास. एवढंच नव्हे तर चोराने, चोरीपूर्वी साईबाबांचे दर्शन घेतल्याचे CCTV मध्ये कैद झालं.  पहाटे पुजाऱ्याच्या निदर्शनास हा प्रकार आलाय या  घटनेमुळे साई भक्तांमध्ये संताप उसळला असून CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

  • 20 Jul 2026 12:08 PM (IST)

    कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ जे. पी. नड्डा यांच्या भेटीला

    कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ जे. पी. नड्डा यांच्या भेटीला पोहोचलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दास यांनी दिली माहिती.

  • 20 Jul 2026 12:03 PM (IST)

    शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीत पार पडली बैठक

    श्रीकांत शिंदे यांचा दिल्लीतील शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली.  डिलीमिटेशन बिलासंदर्भात खासदारांची बैठक, शिवसेनेच्या खासदारांना बिलाला पाठिंबा आहे.  शिवसेनेचे जुने खासदार आणि नव्याने आलेले सहा खासदारांची एकत्रित बैठक झाली. श्रीकांत शिंदेंकडून या सगळ्या खासदारांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच संपूर्ण अधिवेशन काळात कसं कामकाज असेल यावर रणनीती निश्चित केली जाणार.

  • 20 Jul 2026 11:48 AM (IST)

    जंतर-मंतर वरील लाठीचार्ज विरोधात शरद पवार गट आक्रमक

    जंतर-मंतर वरील लाठीचार्ज नंतर बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी. धरणे आंदोलनाला सुरुवात. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर झालेल्या लाठीचार्जचा केला निषेध. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. राजीनामा झाला नाही तर व्यापक स्वरूपात उग्र आंदोलन करण्याचा आंदोलकांचा इशारा.

  • 20 Jul 2026 11:30 AM (IST)

    परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, सईद खान चार मतांनी विजयी

    परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नवनिर्वाचित विधान परिषद आमदार सईद खान यांचा चार मतांनी विजय, तर राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांचे निकटवर्तीय विजय जामकर यांचा पराभव झाल्याने आमदार राजेश विटेकर यांना मोठा धक्का. आमदार सईद खान यांना 290 मते मिळाली तर,पराभूत उमेदवार विजय जामकर यांना 286 मते मिळाली.

  • 20 Jul 2026 11:16 AM (IST)

    हरिश्चंद्र गडावर दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी

    हरिश्चंद्र गडावर दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी. भंडारदरा परिसरात रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. गड उतरत असताना पाऊस सूरू असल्याने अचानक माती-दगड कोसळले. रेलिंगमुळे मोठा अनर्थ टळला.

  • 20 Jul 2026 11:13 AM (IST)

    सभागृहात कामकाज सुरु होताच लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

    सभागृहात कामकाज सुरु होताच लोकसभेत विरोधकांचा गदारोळ. नीट पेपरफुटी तसचं राम मंदिर दान चोरी प्रकरणी चर्चेची मागणी. विरोधकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी.

  • 20 Jul 2026 11:09 AM (IST)

    राजीनामा घेणे किंवा न घेणे हा पंतप्रधानांचा अधिकार – संजय शिरसाट

    “जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनात विद्यार्थ्यांची बाजू घेणे गैर नाही. परंतु राजीनामा घेणे किंवा न घेणे हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. तो त्यांनी कधी वापरायचा हे तेच सांगू शकतील. हे जे आंदोलन सुरू आहे, याची दखल सरकारने जरूर घेतली असेल” असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 20 Jul 2026 11:00 AM (IST)

    पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सहा दगडी फ्लोरिंग भाविकांसाठी खुल्या

    विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम पूर्ण झालंय. मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे मुळ प्राप्त झालंय. यातून सभा मंडपा शेजारील सहा दगडी पुरातन फ्लोरिंग भाविकांसाठी खुल्या करण्यात आल्यात. यामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली‌ये.

  • 20 Jul 2026 10:28 AM (IST)

    ठाकरे गटाच्या आंदोलनावर पोलिसांकडून तीन गुन्हे दाखल

    ठाकरेंच्या कालच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विना परवानगी आंदोलनाचे आयोजन केल्या प्रकरणी ठाकरेंच्या आंदोलनाचे आयोजकांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Jul 2026 10:20 AM (IST)

    दिल्लीत आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सुरुवात

    दिल्लीत आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मोर्चात सहभागी झाले आहेत.

  • 20 Jul 2026 10:05 AM (IST)

    माऊलींची पालखी माळशिरसकडे मार्गस्थ

    नातेपुतेहून माऊलींची पालखी माळशिरसकडे मार्गस्थ झाली आहे. आज पुरंदवडे येथे गोल रिंगण सोहळा रंगणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आज नातेपुते ते माळशिरस असा प्रवास सुरु झाला आहे. पुरंदवडे येथे आज गोल रिंगण सोहळा रंगणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  • 20 Jul 2026 09:50 AM (IST)

    पार्किंगमध्ये चार्जिंग होत असलेल्या इलेक्ट्रिक विकला लागली भीषण आग

    पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात आज सकाळी पार्किंग मध्ये चार्ज होत असलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकी वाहनांनी अचानक पेट घेतल्याने आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खात झाली आहेत तर आगीचा भडका दोन मजल्याच्या बिल्डिंगला लागल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन तीन अग्नीशमन बंब च्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर करत आहे

  • 20 Jul 2026 09:40 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर कारने धडक देऊन हॉकी स्टिक, लोखंडी पाइप आणि दांडक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • 20 Jul 2026 09:30 AM (IST)

    संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्हयात प्रवेश

    अकलूज येथे संत तुकाराम महाराज यांची पालखी दाखल. अकलूज येथे संत तुकाराम महाराज यांची पालखी असणार मुक्कामी. संत तुकाराम महाराज पालखीवर अकलूज येथे प्रवेश केल्यानंतर जेसीबीतून पुष्पवृष्टी. जिल्हाधिकारी कार्तिकेयन प्रशासनातील अधिकारी,सिनेकलाकार भाऊ कदम यांची स्वागताला उपस्थिती

  • 20 Jul 2026 09:20 AM (IST)

    नीट पेपर लीक प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा तपास अद्याप सुरूच

    नीट पेपर लीक प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा तपास अद्याप सुरूच आहे, सीबीआयने लातूर शहरातल्या अनेक ठिकाणी चौकशी करीत एका नवीन प्राध्यापकाचा शोध सुरू केला आहे. एका शैक्षणिक संस्थेला भेट देत या प्राध्यापकाची माहिती मिळविण्यात आली आहे. या प्राध्यापक व्यक्तीचा शोध का आणि कशासाठी घेतला जातो आहे ,हे मात्र कळलेले नाही.

  • 20 Jul 2026 09:05 AM (IST)

    नारायणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड तब्बल २६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    पुणे ग्रामीण पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील वळणवाडी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल २६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • 20 Jul 2026 08:57 AM (IST)

    नीट पेपर लीक प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा तपास अद्याप सुरूच

    नीट पेपर लीक प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा तपास अद्याप सुरूच आहे, सीबीआयने लातूर शहरातल्या अनेक ठिकाणी चौकशी करीत एका नवीन प्राध्यापकाचा शोध सुरू केला आहे. एका शैक्षणिक संस्थेला भेट देत या प्राध्यापकाची माहिती मिळविण्यात आली आहे. या प्राध्यापक व्यक्तीचा शोध का आणि कशासाठी घेतला जातो आहे ,हे मात्र कळलेले नाही.

  • 20 Jul 2026 08:50 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार; शाळकरी विद्यार्थ्यांची पाण्यातून वाटचाल, काही वेळातच पाण्याचा निचरा

    कल्याण-डोंबिवलीत काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.  रात्रीही अधूनमधून जोरदार सरींनी हजेरी लावली. कल्याणमधील छत्रपती शिवाजी चौक, गुरुदेव हॉटेल रोड आणि आंबेडकर रोड परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला. पावसाचा जोर ओसरताच साचलेल्या पाण्याचा काही वेळातच निचरा झाला. सखल भागांमध्ये तात्पुरत्या जलसाच्यामुळे वाहतूक आणि नागरिकांची काही काळ गैरसोय झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील सखल रस्त्यांवर पुन्हा पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 20 Jul 2026 08:40 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. वर्ध्याच्या विरुळ जवळील रात्रीच्या सुमारास घटना घडली आहे.  मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झालेला असल्याने दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू असताना अपघात घडला. अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू असून महामार्ग पोलीस, पुलगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

  • 20 Jul 2026 08:30 AM (IST)

    नालासोपाऱ्यात एका व्यक्तीचे हात बांधून नागरिकांनी दिला बेदम चोप

    नालासोपाऱ्यात एका व्यक्तीचे हात बांधून नागरिकांनी बेदम चोप दिला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती मुलं चोरतो असा त्याच्यावर आरोप करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. नालासोपारा पूर्व नगीनदास पाडा येथे काल दुपारी चार ते साडे चार ची घटना असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसान कडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

  • 20 Jul 2026 08:25 AM (IST)

    बोरिवलीतील फळांच्या दुकानाच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य; उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीचा दावा, अधिकृत पुष्टी अद्याप नाही

    मुंबईकरांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओद्वारे केला जात आहे. बोरिवली (पश्चिम) परिसरातील एका फळविक्रेत्याच्या दुकानाचा असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये काही फळांवर उंदीर ताव मारताना आणि फळे कुरतडताना दिसत आहेत. या कथित उंदरांनी कुरतडलेल्या फळांचीच ग्राहकांना सर्रास विक्री केली जात असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. उंदरांमुळे प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या गंभीर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबईकरांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने तपास करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

  • 20 Jul 2026 08:20 AM (IST)

    रांजणगाव एमआयडीसीत दुर्दैवी अपघात; चालकाचा मृत्यू

    रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये माल भरल्यानंतर टेम्पो चालक वाहनाच्या मागील बाजूस पडदा बांधत होता. याचवेळी तो टेम्पो आणि लोडिंग रॅम्प यांच्या दरम्यान अडकला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे रांजणगाव एमआयडीसी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताची रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

  • 20 Jul 2026 08:15 AM (IST)

    पावसाअभावी लातूर जिल्ह्यातला शेतकरी हवालदिल

    पावसाअभावी लातूर जिल्ह्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती पिकं वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पहायला मिळते आहे. चाकुर तालुक्यातल्या दापक्याळ येथील शेतकऱ्याने टँकरने पाणी विकत घेऊन टोमॅटो शेती वाचविण्याचा प्रयत्न चालवला आहे. मैनोद्दीन शेख यांनी आपल्या एक एकर शेतीत टोमॅटोची लागवड केली आहे, मात्र पाऊसच झाला नसल्याने रोपे सुखली आहेत. उष्ण हवामानामुळे टोमॅटोची रोपे करपू लागल्याने त्यांनी अखेर टँकरने पाणी विकत घेत, कुटुंबासह घागरीने रोपांना पाणी देत पिकांना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच अवस्था लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची झाली आहे.

  • 20 Jul 2026 08:11 AM (IST)

    तो अस्वल पुन्हा गोंदिया शहरात परतला, रात्री च्या वेळेस नागरी वस्तीमध्ये फिरताना सीसीटीव्ही कैद…

    तो अस्वल पुन्हा गोंदिया शहरात आल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण रात्रीच्या सुमारास तो अस्वल नागरी वस्तीमध्ये मुक्त संचार करताना सीसीटीव्ही मध्ये घेत झालेला आहे…. हा अस्वल गोंदिया शहरात दोन दिवसा आधी गणेश नगर व गोविंदपूर परिसरात आल्याने दहशत निर्माण झाली होती. या अस्वलाला रेस्क्यू करण्यासाठी आलेल्या वन विभागातील एका कर्मचाऱ्याला अस्वलाने जखमी करून त्या ठिकाणावरून पड काढला होता…. यावेळेस वनविभागाला अस्वलाला रेस्क्यू करण्यासाठी अपयश आले होते. मात्र पुन्हा हा अस्वल आता शहरात आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…. तर वनविभागाला अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत…..

भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात घटना घडली आहे. सदरील गाडीमध्ये आमदार नारायण कुचे नव्हते तर त्यांचे चालक,सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी होता. आमदार नारायण कुचे आणि त्यांचे सहकारी छत्रपती संभाजी नगर वरून पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना अपघाताची घटना घडली आहे. अपघातात कोणती जीवित हानी झाली नाही. पण गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. तर पावसाबद्दल देखली मोठी अपडेट समोर येत आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडला आहे. पण शहरात कुठेच पाणी साचलं नाही. पहाटे पासून पावसाने विश्रांती घेतली असून, शहरातील लोकल आणि वाहतूक सुरळीत सुरू आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Published On - Jul 20,2026 8:10 AM

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !.

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !