AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News : 7/12 जमीन विक्री व्यवहारातील सुरक्षिततेसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: Oct 22, 2026 | 9:18 AM
Share

Maharashtra News : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रा उत्सवासाठी सप्तशृंगी गड सज्ज. कोजागिरीसाठी एक लाख कावड धारकासह तीन लाख भाविक गडावर येण्याचा अंदाज. शनिवार रविवार सुट्टीचे दिवस आल्याने कोजागिरी यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता. कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारानंतर गडावर जाण्याचा घाट रस्ता खाजगी वाहनांसाठी राहणार बंद.

Maharashtra News : 7/12 जमीन विक्री व्यवहारातील सुरक्षिततेसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Breaking News

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Oct 2026 09:40 AM (IST)

    अजितदादांचा पीए असल्याची थाप, अनेकांचा विश्वासघात

    अजितदादांचा पीए व शिक्षक संघाचा अध्यक्ष आहे असे सांगून आरोपी तुळशीदास जाधव यांनी मीरा भाईंदर मधील दोन महिलांची फसवणूक केली.ही घटना मार्च २०२५ मध्ये घडली तुम्हाला शिक्षण खात्यात नोकरी लावतो असे त्या महिलांना आरोपीने अमिश दाखवले आणि त्यांच्याकडून 21 लाख घेतले. त्यानंतर आरोपीने त्या महिलांचे फोन उचलणे बंद केले त्यानंतर महिलांनी भाईंदर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तुळशीदास जाधवला सोलापूरमधून अटक केली, आरोपी विरोधात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती डीसीपी राहुल चव्हाण यांनी दिली. आरोपीच्या मोबाईल मध्ये अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी राजकीय नेत्यांसोबतचे फोटो दाखवून अनेकांना गंडा घालत असल्याचे पोलिसांचे निदर्शनास आले आहे

  • 22 Oct 2026 09:30 AM (IST)

    डोंबिवलीकरांचा पाणी कपातीवरून संताप

    डोंबिवलीत ३६ तासांच्या पाणी कपातीवरून रहिवाशांचा आक्रोश दिसून आला. एमआयडीसी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्याला जाब विचारला गेला. शुक्रवार-शनिवारचा शटडाऊन रद्द करा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. पाण्याचा टिपूस नसताना पुन्हा शटडाऊनचे संकट आल्याने नागरीक आक्रमक झाले आहेत.

  • 22 Oct 2026 09:20 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गडद, १०० टक्के पंचनामे पूर्ण; शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा

    आभाळाने साथ सोडली.जमिनीने ओलावा गमावला. आणि हातातोंडाशी आलेला घासही हिरावला! नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळाने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. खरीप हंगामातील पिकं तर करपलीच, पण त्यासोबत शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षाही मातीमोल झाल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून १०० टक्के पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, शासनाकडून नेमक्या कोणत्या निकषांवर मदत मिळणार, नुकसानभरपाई किती मिळणार आणि ही मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी पडणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे डोळ्यांसमोर उध्वस्त झालेली शेती, तर दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर.. पिकांसाठी केलेला खर्च, घेतलेले कर्ज आणि वर्षभराची मेहनत दुष्काळाने हिरावून घेतली आहे. अशा परिस्थितीत बळीराजाला आता केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष आर्थिक मदतीची गरज आहे. पंचनामे पूर्ण झाले, आता मदत कधी मिळणार? नुकसानभरपाईचे निकष जाहीर होणार तरी कधी? असे अनेक प्रश्न दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. त्यामुळे मायबाप शासनाने मदतीचे निकष तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण शेतकऱ्याने केवळ पीक गमावलेलं नाही, तर त्या पिकासोबत आपली स्वप्नंही पेरलेली असतात. दुष्काळाने बळीराजाचं कंबरडं मोडलंय. आता शासन मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणार का? हाच खरा प्रश्न आहे.

  • 22 Oct 2026 09:10 AM (IST)

    विकासाच्या नावाखाली ५० ते १०० वर्षे जुन्या महावृक्षांची कत्तल; पर्यावरणप्रेमी आक्रमक

    नंदुरबार शहरासह जिल्ह्यात नवीन महामार्गांची निर्मिती आणि रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र, या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याने आता पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. विकासाला विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली शेकडो वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल का, असा सवाल उपस्थित करत वृक्षप्रेमींनी वृक्षतोड करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि विभागाच्या विरोधात मूक आंदोलन केले. नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढत वृक्षतोडीचा निषेध नोंदवण्यात आला. नंदुरबार जिल्हा आधीच तीव्र उन्हाळा आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली वड, पिंपळ आणि कडुलिंब यांसारख्या जुन्या आणि ऐतिहासिक वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड केली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली आहे, त्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करण्यात आलेली नसल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वृक्षतोडीमुळे जिल्ह्याचे हरित आच्छादन कमी होण्यासोबतच भूजल पातळीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच पक्षी आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या गंभीर विषयाकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहेत.

  • 22 Oct 2026 09:05 AM (IST)

    नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी मतदान साहित्य वितरणासाठी यंत्रणा सज्ज

    नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी एकूण ४५५ मतदान केंद्र निश्चित, त्यापैकी सर्वाधिक २४६ केंद्र नागपूर जिल्ह्यात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान पथक सज्ज,२ हजार ५३५ अधिकारी,कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली याशिवाय केंद्र शासनाचे ४७६ अधिकारी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे ३२ अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार मतदान तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार.

  • 22 Oct 2026 08:52 AM (IST)

    7/12 जमीन विक्री व्यवहारातील सुरक्षिततेसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

    सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील सुरक्षिततेसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मालमत्तेची विक्री करताना सामायिक 7/12 वरील सहहिस्सेदारांची संमती, ना हरकत प्रमाणपत्र तसेच भूमिअभिलेखची क प्रत बंधनकारक. एकाच 7/12 वर नाव असलेल्या इतर व्यक्तींना अंधारात ठेवून होणाऱ्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार. वैध कागदपत्रे नसल्यास दस्तनोंदणीवर बंदी

  • 22 Oct 2026 08:40 AM (IST)

    गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट

    गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट. अध्यक्ष निवडीच्या सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी 14 संचालकांची गरज. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे आहेत 13 संचालक तर महायुतीकडे आहेत 12 संचालक. अध्यक्ष निवडीत तयार होणार तांत्रिक पेच.

  • 22 Oct 2026 08:30 AM (IST)

    भारत आणि अमेरिका व्यापार करार करण्याच्या अगदी जवळ

    भारत आणि अमेरिका व्यापार करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले असल्याची ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेने अन्य देशांबरोबर केलेल्या करारापेक्षा भारताबरोबरचा करार भिन्न असेल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी 2025 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून व्हिएतनाम, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाशी व्यापार करार केले आहेत.

  • 22 Oct 2026 08:18 AM (IST)

    नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार थांबला

    नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार थांबला. काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे सह एकूण 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात एकूण 2 लाख 55 हजार मतदारांची नोंदणी.यामध्ये 1 लाख 47 हजार 280 पुरुष मतदार आणि 1 लाख 8 हजार 301 महिला मतदाराचा समावेश.

अहिल्यानगर जिल्हा बँकेत 21 पैकी 9 जागा बिनविरोध. जिल्हा बँकेच्या 12 जागेंसाठी होणार निवडणूक. माजी खासदार सुजय विखे, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डीले बिनविरोध. बिनविरोधसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या बैठका निष्फळ ठरल्या. विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि खा.निलेश लंके यांना विखे-थोरतांनी शेवटच्या क्षणी बैठकीत बोलावल्याने शिंदे-लंके होते नाराज. काही ठिकाणी शिंदे विरुध्द विखे- थोरात असा सामना होणार तर काही ठिकाणी लंके विरुद्ध विखे-थोरात सामना होणार. जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले. गोंदिया जिल्ह्यात नव्या बोरवेल खोदण्यावर बंदी. भूजल पातळी 12 सेंटीमीटरने घसरली. भूजल पातळी खालावली. कूपनलिका खोदण्यासाठी आता विशेष परवानगी आवश्यक. पाण्याचा उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय. पिण्याच्या पाण्यासाठी सवलतीची तरतूद.

Published On - Oct 22,2026 8:15 AM

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?