कराळे मास्तरांना मोठा धक्का, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून हकालपट्टी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नितेश कराळे यांना मोठा धक्का बसला आहे. कराळे मास्तर यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उद्या 23 ऑक्टोबर रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघ, पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच जांगाचा समावेश आहे. दरम्यान यातील काही जागांवर महायुती आणि महविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार उभे आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील उमेदवार देण्यात आला आहे, आणि शिवेसेना ठाकरे गटाकडून देखील उमेदवार देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघात देखील असंच चित्र पहायला मिळत आहे. इथेही शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत.
तर दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघामधून अभिजीत वंजारी यांना महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आताना देखील नितेश कराळे गुरुजी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला, त्यामुळे आता त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नितेश कराळे यांना मोठा धक्का बसला आहे.
उद्या मतदान
दरम्यान उद्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये तीन पदवीधर तर दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या पाचही जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? कोण बाजी मारणार? मतदार कोणाला कौल देणार याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पाच पैकी काही मतदारसंघात अटितटीची लढत होण्याची शक्यता आहे. मराठावाडा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
