Delhi News : बलात्कार करुन शेतात फेकलेला पीडितेचा मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला, ऐकूनच थरकाप उडवणारी घटना

Delhi News : पीडित मृत मुलगी आरोपींना ओळखत होती. ते सर्व एकत्र टेम्पो मधून प्रवास करत असताना हा गुन्हा घडला असं पोलिसांनी सांगितलं. टेम्पोमध्येच ते एकत्र दारु प्याले.

Delhi News : बलात्कार करुन शेतात फेकलेला पीडितेचा मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला, ऐकूनच थरकाप उडवणारी घटना
Representative image
| Updated on: Sep 18, 2026 | 12:00 PM

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे बनवले. पण अजूनही देशाच्या राजधानीत महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. राजधानी दिल्लीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा मृतदेह मोकळ्या शेतात फेकून देण्यात आला. तिथे भटक्या कुत्र्यांनी या मृतदेहाच्या शरीराचे लचके तोडले, मृतदेहाचा काही भाग खाल्ला. आरोपींनी सामूहिक बलात्कार करुन या मुलीची भोसकून हत्या केली. या प्रकरणात एकूण चार आरोपी असून तीन अल्पवयीन आरोपी आहेत. 13 सप्टेंबरला पीडितेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उजेडात आली. पोलिसांनी सांगितलं की, मृतदेह सापडला त्यावेळी इतक्या खराब अवस्थेत होता की, त्यावरुन लिंगाची ओळखही पटवता येत नव्हती.

पीडित मृत मुलगी आरोपींना ओळखत होती. ते सर्व एकत्र टेम्पो मधून प्रवास करत असताना हा गुन्हा घडला असं पोलिसांनी सांगितलं. टेम्पोमध्येच ते एकत्र दारु प्याले. नंतर त्यांनी मुलीवर बलात्कार केला. तिची हत्या केली व मृतदेह फेकून दिला. उत्तरपूर्व दिल्लीत 13 सप्टेंबरला कुशक रोडवर स्वरुप नगर मध्ये जयपाल राणा यांच्या शेतात पीडित मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृतदेहाचा काही भाग भटक्या कुत्र्यांनी खाल्लेला होता. एका हात मृतदेहापासून तुटून बाजूला पडलेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज पोलिसांनी तपासलं

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, ती अनेकदा घरातून निघून जाते व काही दिवसांनी परत येते. बीएनएस आणि पॉस्को कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या मार्गावरील 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज पोलिसांनी तपासलं आहे. गुन्हा घडला त्या वेळेत टेम्पो त्या भागात धावताना दिसत आहे. अंधार असल्यामुळे रजिस्ट्रेशन नंबर स्पष्टपणे दिसत नाहीय. या टेम्पोला शोधण्यासाठी पोलिसांनी त्या मार्गावर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले.

ड्रायव्हरची ओळख पटवून चौकशी

15 आणि 16 सप्टेंबरच्या रात्री शोध मोहिम राबवून पोलिसांनी संशयित टेम्पो ताब्यात घेतला. ड्रायव्हरची ओळख पटवून चौकशी केली. त्यातून गुन्ह्याची उकल झाली. शिवम उर्फ सुदामा उर्फ चुचू याची ओळख पटवण्यात आली. तीन अल्पवयीन आरोपी 16 ते 17 वयोगटातील आहेत. गुन्ह्यामध्ये दोन चाकूंचा वापर झाला. आरोपींनी त्यावेळी घातलेले कपडे आणि टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. घटनाक्रम जुळवण्यासाठी पुढील तपास सुरु आहे. गुन्ह्यामध्ये प्रत्येकाची काय भूमिका आहे हे सुद्धा तपासलं जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us