कोण म्हणतं लोक फक्त थिल्लरपणावर भाळतात? हा भजनाचा कार्यक्रम बघा, भाविकांकडून नोटांचा पाऊसच…

2018 मध्ये अहमदाबाद शहरात कीर्तिदान गढवी यांच्यावरही भाविकांनी नोटांची अक्षरशः उधळण केली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

कोण म्हणतं लोक फक्त थिल्लरपणावर भाळतात? हा भजनाचा कार्यक्रम बघा, भाविकांकडून नोटांचा पाऊसच...
Image Credit source: ANI
| Updated on: Dec 29, 2022 | 8:45 AM

अहमदाबादः लावणी (Lavni) तसेच तमाशाच्या कार्यक्रमात पैसे उधळण्याचे अनेक कार्यक्रम आपण आतापर्यंत पाहिलेत. तरुणाईला तर हल्ली भानच राहिलेलं नाही. थिल्लरपणावर पैसे उधळण्याचं प्रमाण खूप वाढलंय, अशी वाक्य अनेकदा ऐकू येतात. पण समाजात चांगल्या कार्यासाठी सढळ हाताने पैसा देणाऱ्या तसंच कलेची कदर करणाऱ्यांचीही कमी नाही, हे एका कार्यक्रमातून दिसून आलंय. गुजरातमध्ये (Gujrat) नुकताच एक भजनाचा (Bhajan) कार्यक्रम झाला.

गुजरात राज्यातील नवसारीमध्ये भजन सुरु असताना भाविकांनी चक्क नोटांचा पाऊसच पाडला. गायकाला या कार्यक्रमातून 40 ते 50लाख रुपये मिळाल्याचं म्हटलं जातंय.

लोक गायक कीर्तिदान गढवी यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटोही तुफ्फान व्हायरल होत आहेत.

स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर ट्रस्टच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात शेकडो भाविक उपस्थित होते.

नवसारी येथील सूपा गावात भजनसंध्या आयोजित करण्यात आली होती. लोकगायक एकानंतर एक भजन सादर करत होते.

स्टेजवर बसून गायक भजन सादर करत होते. त्यांच्या बाजूला वाद्ययंत्राचे साथीदारही होते. पण उरलेली जागा नोटांनी भरून गेली.

या कार्यक्रमाला लोकगायक कीर्तिदान गढवीदेखील पोहोचले होते. त्यांनी एनआयला माहिती दिली. सूपा गावातील या कार्यक्रमात गायकांना जवळपास 40 ते 50 लाख रुपये बक्षीस मिळाले.

2018 मध्ये अहमदाबाद शहरात कीर्तिदान गढवी यांच्यावरही भाविकांनी नोटांची अक्षरशः उधळण केली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.