AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

19 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक होताच प्रसिद्ध कंटेट क्रिएटरची आत्महत्या? इंटरनेटवर खळबळ

प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर सोफिक एसकेचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर त्यांच्या आत्महत्येच्या अफवा पसरल्या, मात्र त्या पूर्णपणे खोट्या ठरल्या. या घटनेने डिजिटल गोपनीयतेचे गंभीर प्रश्न निर्माण केले आहे.

19 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक होताच प्रसिद्ध कंटेट क्रिएटरची आत्महत्या? इंटरनेटवर खळबळ
video leak
| Updated on: Nov 28, 2025 | 7:52 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर सोफिक एसकेचा गर्लफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाला होता. यानंतर ते दोघेही मोठ्या आणि गंभीर वादात सापडले होते. त्यांचा एक कथित खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तो ट्विटर, टेलिग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरला. या घटनेमुळे त्या दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. यामुळे सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर्सच्या खासगी आयुष्याच्या गोपनीयतेबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता यामागील सत्य समोर आले आहे.

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध डिजीटल क्रिएटर असलेल्या सोफिक एसके आणि त्याची गर्लफ्रेंड एका मोठ्या आणि गंभीर वादात सापडले आहेत. या घटनेमुळे खासगी आयुष्याच्या गोपनीयतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोफिक आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा सुमारे १९ मिनिटांचा एक प्रायव्हेट व्हिडीओ चुकून रेकॉर्ड झाला आणि नंतर तो लीक झाला. हा संवेदनशील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने तो शेअर केला. त्यावर लाखो कमेंट्स पाहायला मिळाल्या. मात्र बेजबाबदारपणामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले.

आत्महत्या केल्याची चर्चा खोटी

हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच काही सोशल मीडिया युजर्सनी एक पोस्ट व्हायरल केली. या पोस्टमध्ये सोफिक एसके आणि त्याच्या गर्लफ्रेंडने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यानंतर झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने इंटरनेटवर गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यानतंर अनेक फॅक्ट-चेकर्सनी याबद्दलची तपासणी केली. त्यावेळी आत्महत्येच्या दाव्यांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे आत्महत्या झाल्याची चर्चा पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले आहे.

आयुष्य आणि प्रतिष्ठा एका क्षणात उद्ध्वस्त

सोफिक एसकेने या प्रकरणावर प्रतिक्रिया देत व्हिडीओ व्हायरल न करण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियावरील बेजबाबदारपणामुळे त्याची आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी आयुष्याची गोपनीयतेची मर्यादा ओलांडली गेली आहे. तसेच अफवांमुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर प्रचंड ताण आला आहे. खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे त्या दोघांना ट्रोलिंग आणि अफवांचा सामना करावा लागला. या घटनेमुळे डिजीटल माध्यमांतील नैतिकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. कोणताही व्हिडीओ किंवा माहिती न तपासता फॉरवर्ड करणे, आत्महत्येसारख्या गंभीर अफवा पसरवणे, यामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य आणि प्रतिष्ठा एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव समोर आला आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...