खर्गेंची खिल्ली उडवली, ‘या’ नेत्याला पडलं महागात, पक्षाच्या सगळ्या पदावरुन केली हकालपट्टी…

पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल आणि पक्षाची बदनामी केलेल्या घटनेमुळे प्राथमिक सदस्यत्व आणि पक्षाच्या इतर सर्व पदांवरून त्यांची हक्काल पट्टी केली आहे.

खर्गेंची खिल्ली उडवली, या नेत्याला पडलं महागात, पक्षाच्या सगळ्या पदावरुन केली हकालपट्टी...
| Updated on: Oct 21, 2022 | 10:00 PM

नवी दिल्लीः तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (DMK) ने काँग्रेसच्या नूतन अध्यक्षांची खिल्ली उडवली होती. त्याप्रकरणी आता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यावरच थेट कारवाई केली गेली आहे. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे कार्यकर्ते के. एस. राधाकृष्णन यांनी ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमध्ये मल्लिकार्जू खर्गे (Mallikarjun Kharge) यांची खिल्ली उडवली होती. त्यानी ती खर्गेंची उडवलेली खिल्लीची एक पोस्ट शेअर केली होती. त्याममध्ये त्याला कथित मनमोहन 2.0 म्हणून दाखवण्यात आले होते. त्या पोस्टमधून द्रमुकच्या त्या माजी नेत्याने थेट गांधी कुटुंबीयांवर (Gandhi Family) हल्ला केला होता.

डीएमकेच्या नेत्यावर कारवाई झाल्यानंतर मात्र अजूनही गांधी घराण्याच्या हातात सत्ता असल्याचे बोलले जात आहे. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्यांदा मिळालेल्या कार्यकाळातही सर्व सत्ता ही गांधी घराण्याकडेच होती, त्याचप्रमाणे खर्गे असल्याचे त्यामध्ये दाखवण्यात आले होते.

त्यामुळे त्यांनी उडवलेल्या खिल्लीची दखल घेत द्रमुकचे सरचिटणीस एस दुराईमुरुगन यांनी शुक्रवारी राधाकृष्णन यांच्यावर कारवाईची घोषणा केली.

दुरैमुरुगन म्हणाले की, राधाकृष्णन यांना “पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल आणि पक्षाची बदनामी केलेल्या घटनेमुळे प्राथमिक सदस्यत्व आणि पक्षाच्या इतर सर्व पदांवरून त्यांची हक्काल पट्टी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राधाकृष्णन यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई केल्यानंतर मात्र मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी त्यांच्या मंत्र्यांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

स्टॅलिन यांनी 9 ऑक्टोबर रोजी पक्षाचे अध्यक्ष म्हणून ते आपला दुसऱ्यांदा कार्यकाळ सुरू करताना त्यांना सांगितले होते की, एकीकडे मी डीएमकेचा नेता आहे, तर दुसरीकडे मी तामिळनाडूचा मुख्यमंत्रीही आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला होता.