AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची आता युद्धाबाबत मोठी घोषणा, जगभरात खळबळ, आता इराणचं काय होणार?

इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर भीषण हल्ले करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे इराणकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची आता युद्धाबाबत मोठी घोषणा, जगभरात खळबळ, आता इराणचं काय होणार?
trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 02, 2026 | 7:28 PM
Share

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देखील अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. अमेरिकेने युद्धाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी इराणमधील इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डचं मुख्यालय उडवलं. अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. इराणच्या संपूर्ण मिलिट्री कमांडचा खात्मा झाला आहे. आता त्यांचे अनेक अधिकारी जीव वाचवण्यासाठी शरण येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र तरी देखील आम्ही आमचं ऑपरेशन संपूर्ण ताकदीने सुरूच ठेवू, हे ऑपरेशन तोपर्यंत सुरूच राहील, जोपर्यंत आम्ही आमचा उद्देश पूर्ण करत नाहीत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे लोक देखील मारले जातील

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे बोलताना म्हटलं की,कदाचित या युद्धामध्ये अमेरिकेचे आणखी काही लोक मारले जातील, मात्र आम्ही प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या मृत्यूचा बदला इराणकडून घेऊ, मी पुन्हा एकदा इराणच्या सौन्याला सांगतो की आता त्यांनी शस्त्र खाली ठेवावेत. जर त्यांनी युद्ध सुरूच ठेवलं तर त्यांचा मृत्यू निश्चित आहे. मी त्यांना आधीच दोन आठवड्यांचा वेळ दिला होता, ते दोन आठवड्यात खूप काही करू शकले असते, परंतु त्यांनी काहीही केलं नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इराणी नागरिकांना काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना उद्देशून म्हटलं आहे की, ज्या देशभक्त लोकांना स्वातंत्र्य पाहिजे, त्यांनी आता या संधिचा फायदा घ्यावा, तुम्ही सर्व शूर व्हा, हिंमत दाखवा, आपला देश आपल्या ताब्यात घ्या, अमेरिका सदैव तुमच्यासोबत आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी माझं वचन पूर्ण करेल आता बाकी सगळं तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही कधीही तुमच्या मदतीसाठी हजर असू, असं यावेळी ट्र्म्प यांनी म्हटलं आहे. रविवारी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर इराणकडून देखील अमेरिका आणि इस्रायला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान युद्ध सुरू राहणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिल्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...