AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duologue NXT चा पहिला एपिसोड रिलीज, ग्लोबल स्टार रोना -ली शिमोन यांची TV9 नेटवर्कचे एमडी बरुण दास यांच्यासोबत गप्पांची मैफिल

टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे ड्युओलॉग एनएक्सटी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेत्री रेना -ली शिमोन पहिल्या पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या. शिमोन यांनी फौदा या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या वेबसिरीजमध्ये नुरीनची भूमिका साकारली आहे.

Duologue NXT चा पहिला एपिसोड रिलीज, ग्लोबल स्टार रोना -ली शिमोन यांची TV9 नेटवर्कचे एमडी बरुण दास यांच्यासोबत गप्पांची मैफिल
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 24, 2025 | 4:05 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे ड्युओलॉग एनएक्सटी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेत्री रेना -ली शिमोन पहिल्या पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या. शिमोन यांनी फौदा या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या वेबसिरीजमध्ये नुरीनची भूमिका साकारली आहे, त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली. दरम्यान या कार्यक्रमामध्ये सहभागी होत शिमोन यांनी बरुण दास यांच्यासोबत आपल्या आयुष्यात आलेली आव्हाने, ती सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आयुष्यातील ध्येयांबद्दल चर्चा केली.

या कार्यक्रमात बोलताना रेना -ली शिमोन यांनी म्हटलं की, आपल्या आयुष्यात, जीवनाच्या प्रवासात अनेक अडचणी येत असतात, त्यावर मात करून आपल्याला चिकाटीनं पुढे जावं लागतं. सो यू थिंक यू कॅन डान्सशोमध्ये मी पाचव्या क्रमांकावर होते, मात्र तरी देखील मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, यावरून हेच सिद्ध होतं की अपयशातून देखील तुम्हाला संधी मिळू शकते. जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यश मिळू शकतात, असं यावेळी शिमोन यांनी म्हटलं आहे.

यावर बोलताना बरुण दास म्हणाले की, आयुष्यात कोणताही निर्णय योग्य नसतो, मात्र तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो आणि तो योग्य आहे हे सिद्ध करावं लागतं. अपयशामुळे खचून जाणं हा पर्याय नाही. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्याचा निकाल काहीही असो, मात्र तुम्ही जर त्यातून शिकत राहिलात तर तुमच्या वाट्याला अपयश कधीच येणार नाही.

दरम्यान शिमोन पुढे बोलताना म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात, तुमचा तुमच्यावर विश्वास असतो. तेव्हाच तुम्हाला यश मिळतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं ध्येय गाठायचं असेल तर कठोर परिश्रम करा, कष्टाला पर्याय नाही, लक्षात ठेवा जर तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर ज्या गोष्टी घडणार नाहीत, त्या देखील घडतात, जगात अशक्य काहीच नाही.

ड्युओलॉग एनएक्सटीचा हा पहिला भाग आहे, ही एका नव्या अध्यायाची सुरुवात मानली जाऊ शकते. या शोच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या महिला या इतर महिलांसाठी एक नवा प्रेरणास्त्रोत ठरणार आहेत. या कार्यक्रमाचा संपूर्ण भाग 22 सप्टेंबर रोजी रात्री 10 : 30 वाजता न्यूज 9 वर प्रसारित होणार आहे, तसेच ड्युओलॉग यूट्यूब चॅनेल (@Duologuewithbarundas)आणि न्यूज 9 प्लस अॅपद्वारे देखील याचं स्ट्रिमिंग होणार आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला