कमकुवत डोळ्यांनी धोका दिला, चहापावडर ऐवजी किटनाशक टाकलं, दाम्पत्याचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील अशोकनगर जिल्ह्यात एका वयस्क दाम्पत्याचा सकाळच्या चहाने बळी घेतला आहे.

कमकुवत डोळ्यांनी धोका दिला, चहापावडर ऐवजी किटनाशक टाकलं, दाम्पत्याचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 5:24 PM

भोपाळ : मध्य प्रदेशमधील अशोकनगर जिल्ह्यात एका वयस्क दाम्पत्याचा सकाळच्या चहाने बळी घेतला आहे. आजींची दृष्टी कमी झालेली असल्याने त्यांना अस्पष्ट दिसत होतं. त्यातच त्यांनी चहा करताना चहा पावडर ऐवजी किटकनाशक टाकलं. हा चहा पिऊन आजी आणि आजोबा दोघांचाही मृत्यू झालाय, तर त्यांच्या मुलावरही उपचार करण्यात आले (Elder couple death due to drinking poisonous tea in Madhya Pradesh).

मुंगावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कछियाना भागात राहणाऱ्या श्रीकिशन सेन आणि कोमलबाई यांचा तो सकाळच्या चहा त्यांचा शेवटचा चहा असेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. श्रीकिशन सेन रोजच्या प्रमाणे मंदिरात जाण्यासाठी तयार होत होते. त्यांची पत्नी कोमलबाई स्वयंपाक घरात गेल्या आणि चहा तयार करण्यास सुरुवात केली. स्वयंपाक घरातील चहापावडर संपल्याने त्या दुसऱ्या खोलीत जाऊन चहा पावडर घेऊन आल्या. मात्र, वयोमानानुसार दृष्टी कमी झालेली असल्याने कमलाबाईंनी त्या खोलीतून चहा पावडरचा डब्बा आणण्याऐवजी किटकनाशकाचा डबा आणला.

स्वयंपाक घरात येऊन त्यांनी उकळत्या पाण्यात हे किटनाशक टाकलं आणि हाच चहा पतीला देत मुलाला झोपेतून उठवलं. यानंतर त्यांनी स्वतः हा चहा पिला. चहा पिल्यानंतर श्रीकिशन सेन सायकलवरुन मंदिरात गेले. मात्र, काही अंतरावर गेल्यावर लगेचच ते चक्कर येऊन पडले. तोपर्यंत इकडे मुलाने देखील तो चहा प्यायला घेतला. मात्र, त्याला चहा कडसर लागल्याने त्याने थोडा चहा पिऊन तो तसाच ठेवला. याचवेळी शेजाऱ्यांनी श्रीकिशन यांना चक्कर आल्याचं सांगितलं.

श्रीकिशन यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केलं. तिकडं घरात असलेल्या कमलाबाई आणि त्यांचा मुलगा जितेंद्र यांचीही तब्येत बिघडत होती. यानंतर त्यांनाही नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात आल्यावर डॉक्टरांनी कमलाबाई यांना देखील मृत घोषित केलं. मुलगा जितेंद्र मात्र उपचारानंतर वाचला आहे.

हेही वाचा :

Bihar Land Dispute | जमिनीच्या वादातून अ‍ॅसिड हल्ला, 20 जण जखमी, तिघे गंभीर

ड्रग्ज पेडलर्सचं डेअरिंग वाढलं, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर हल्ला

तिघांचा गळफास, चौथा फास कुणासाठी?, अफवा थांबवा, अन्यथा गुन्हे दाखल करु; पोलिसांचा इशारा

Elder couple death due to drinking poisonous tea in Madhya Pradesh

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.