तिघांचा गळफास, चौथा फास कुणासाठी?, अफवा थांबवा, अन्यथा गुन्हे दाखल करु; पोलिसांचा इशारा

काही माध्यमांवरुन चुकीच्या बातम्या दाखवल्या जात असल्याने अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या देणं थांबवा अन्यथा गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलिसांनी दिला आहे

  • सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर
  • Published On - 11:10 AM, 23 Nov 2020

ठाणे : शहापूर चांदे येथे 21 नोव्हेंबर रोजी एका झाडाला साडीने गळफास घेऊन (Three Men Found Hanged Case) लटकलेल्या अवस्थेत तीन मृतदेह मिळाले होते. मात्र ही हत्या की आत्महत्या आहे याचे गूढ उघडले गेलेले नाही. मात्र, काही माध्यमांवरुन चुकीच्या बातम्या दाखवल्या जात असल्याने अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या देणं थांबवा अन्यथा गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलिसांनी दिला आहे (Three Men Found Hanged Case).

याप्रकरणी आतापर्यंत अनेक जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं, काहींना सोडूनही दिलं. आतापर्यंत आरोपी म्हणून एकाही व्यक्तीला अटक केलेली नाही. तरीसुद्धा काही चॅनल्स आणि वृत्तपत्रांमधून अफवांना उधाण आले आहे. तिघांना फाशी दिली आणि चौथा फास कुणासाठी टांगला होता, अशा बातम्या काही चॅनल्समधून झळकल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून अशा प्रकारची कोणतीही माहिती दिली गेलेली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

म्हणून शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी आवाहन केले आहे की, तीन युवकांच्या मृत्यू प्रकरणी आमचा सखोल तपास चालू असून 3 फाशी मागचे नक्की कारण काय आहे?, याचा तपास चालू आहे (Three Men Found Hanged Case).

मात्र अफवांना उधाण आले असून चौथा फास कुणासाठी? दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले, अशा बातम्या काही चॅनलला झळकल्या आहेत. अद्याप एकही आरोपी किंवा कुणाला पकडले नाही. जर एखादे चॅनल किंवा वृत्तपत्र खोटी बातमी प्रसारित करुन जनतेची दिशाभूल करुन अफवा पसरवत असेल, तर त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करु, अशी ताकीद नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

Three Men Found Hanged Case

संबंधित बातम्या :

शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ऐन दिवाळीत प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची आत्महत्या, पतीने विष घेऊन तर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप