पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Husband commit suicide after wife dead)

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 4:35 PM

जळगाव : पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना समोर आली. प्रमोद शेटे (31) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह केलं होतं. (Husband commit suicide after wife dead)

प्रमोद हा जळगावातील कांचन नगरात राहणारा रहिवासी आहे. या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद शेटे याचा कांचन शेटे (26) हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. कांचन शेटे हिचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू विष प्राशन केल्याने झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते.

कांचनच्या मृत्यूनंतर प्रमोदने जळगावातील आसोदा रेल्वे गेट परिसरात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करणाऱ्यापूर्वी प्रमोदने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह करत आपण जगाचा निरोप घेत असल्याची माहिती दिली होती.

कांचनचा मृतदेह जिल्हा रुग्णालय असलेल्या शिरसोली रस्त्यावरील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात हलवण्यात आला आहे. तर प्रमोदचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात शनिपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.(Husband commit suicide after wife dead)

संबंधित बातम्या : 

पोलीस अधीक्षकांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट, लोकांकडे पैशांची मागणी, चंद्रपुरात खळबळ

मंदिरे उघडताच चोरट्यांचा हैदोस, CCTV वर पोते टाकून दानपेटी फोडली

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.