मंदिरे उघडताच चोरट्यांचा हैदोस, CCTV वर पोते टाकून दानपेटी फोडली

जिल्ह्यातील धाबा येथील प्रसिध्द कोंडय्या महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. यावेळी मंदिरातील सीसीटीव्हीवर पोते पांघरुन कनेक्शनही कापण्यात आलं.

मंदिरे उघडताच चोरट्यांचा हैदोस, CCTV वर पोते टाकून दानपेटी फोडली
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 2:22 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मंदिरं उघडताच चोरी झाल्याचं समोर आलं आहे (Robbery In Temple). जिल्ह्यातील धाबा येथील प्रसिध्द कोंडय्या महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. यावेळी मंदिरातील सीसीटीव्हीवर पोते पांघरुन कनेक्शनही कापण्यात आलं. त्यामुळे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अडथळा येत आहे (Robbery In Temple).

राज्यातील मंदिरं उघडल्यावर लगेच चोरट्यांनी मंदिरांवर डाव साधल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र-तेलंगणातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. हे मोठे मान्यतेचे मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या गावात आहे. आजपासून कोंडय्या महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात होत आहे.

देशभरात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे मंदिर धार्मिक स्थळ बंद आहेत. केवळ नैमित्तिक पूजा आणि सणांच्या निमित्ताने होणाऱ्या महापूजेसाठी मंदिरं उघडली जात होती. कालच राज्य सरकारने नियमांचे पालन करुन मंदिरं उघडण्याची परवानगी दिली. त्याचा राज्यभर जल्लोषही झाला.

मात्र, आज सकाळी परमहंस संत कोंड्या महाराज पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात होणार असल्याच्या निमित्ताने ट्रस्टी आणि भाविकांनी मंदिरात प्रवेश करताच त्यांना मंदिराची दानपेटी फोडलेली आढळून आली. हे करताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावर पोते पांघरले आणि केबल कनेक्शन देखील तोडले.

पहाटेला पुजाअर्चा करण्यासाठी भक्त मंदिरात गेले असता चोरीची घटना उघडकीस आली. या घटनेने धाबा गावात एकच खळबळ उडाली आहे. संस्थानने चोरी झाल्याची तक्कार धाबा पोलीस स्टेशनला नोंदवली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Robbery In Temple

संबंधित बातम्या :

रस्त्याने बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल पळवायचे, सोलापूर पोलिसांकडून तीन आरोपींना बेड्या

बारामती पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.