घरातून गायब झालेल्या तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले, आत्महत्येची शक्यता; शहापूर हादरले

जंगलामध्ये एका झाडाला साडीने बांधून गळफास घेतलेले तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घरातून गायब झालेल्या तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले, आत्महत्येची शक्यता; शहापूर हादरले
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 6:51 PM

ठाणे : शहापूर तालुक्यातील खर्डी येथे एकाच झाडाला साडीने गळफास घेऊन लटकलेल्या (Three Men Found Hanged) अवस्थेत 3 मृतदेह आढळून आले. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. खर्डी जवळील चांदा गावातील मामाभाचे आणि शहापूर येथील एक विवाहित तरुण हे तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती (Three Men Found Hanged).

मात्र, आज जंगलामध्ये एका झाडाला साडीने बांधून गळफास घेतलेले तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी आपल्या टीमसोबत जाऊन पाहणी केली असता, ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मात्र, खर्डी गावा जवळील चांदे गावातील एक मामा आणि एक त्याचा लहान भाचा व शहापूर येथी एक तरुण असे तिघांचे मृतदेह एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असला तरी हे तिहेरी हत्याकांड असल्याचा दाट संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव हे घटनास्थळी पोहचले असून पोलीस तपास सुरु आहे. पोलीस तपास नंतरच आत्महत्या की हत्या या गोष्टीचा उलगडा समोर येणार आहे.

Three Men Found Hanged

संबंधित बातम्या :

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींच्या चौकशीतून 20 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

तरुणाचा मृतदेह डिक्कीत आढळल्याने खळबळ; मित्रानेच पैशांमुळे खून केल्याचा संशय

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.