सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींच्या चौकशीतून 20 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोनसाखळी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या चोरांनी लॉकडाऊनच्या काळात शहरात धुमाकुळ घातला होता.

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींच्या चौकशीतून 20 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 5:20 PM

नवी मुंबई : सोनसाखळी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या चोरांनी लॉकडाऊनच्या काळात शहरात धुमाकुळ घातला होता. सखोल तपास केल्यानंतर या पाच जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. विषेश म्हणजे त्यांच्या अटकेमुळे इतर वीस गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे. (chain snatcher gang arrested in Navi Mumbai, 20 lakh rupees seized)

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत नवी मुंबई परिसरात चोनसाखळ्या चोरण्याचे प्रमाण बरेच वाढले होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावरुन जाताना चोरट्यांकडून सोनसाखळ्या पळवल्याच्या तक्रारीही येत होत्या. विशेषत: लॉकडाऊनच्या काळात हा प्रकार बऱ्याच प्रमाणात वाढला होता. सोनसाखळी चोरांचा हा वाढता धुमाकाळ लक्षात घेऊन पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार स्थानिक पोलिसांनी आपला तपास सुरु केला.

चोरांना पकडण्यासाठी झारखंड, ओडिसा पोलिसांची मदत

तपास केल्यानंतर पाच सोनसाखळी चोरांचा पोलिसांना सुगावा लागला. त्यापैकी आरोपी तन्वीर उर्फ दीपक आणि त्याचा एक साथीदार ट्रेनमध्ये प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त सूत्रांकडून समजली. त्यांतर झारखंड आणि ओडिसा पोलिसांच्या मदतीने नवी मुंबई पोलिसांनी या दोन्ही आरोपींना धावत्या ट्रेनमधून पकडले. तसेच इतर आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.

सध्या पाचही आरोप नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून पाचही जणांची कसून चौकशी सुरु आहे. या आरोपींच्या चौकशीदरम्यान नवी मुंबईतील इतर एकूण वीस गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच आरोपींकडून पोलिसांनी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी दिली.

दरम्यान, चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे नवी मुंबई परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातवरण होतं. दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र, आता या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. (chain snatcher gang arrested in Navi Mumbai, 20 lakh rupees seized)

संबंधित बातम्या :

विरारमध्ये जबरी चोरीचा 6 दिवसात छडा, 4 कोटीची रोकड घेऊन पळालेले चोरटे पकडले

दीड वर्षांपासून लपाछपीचा खेळ, नागपूर पोलिसांनी वाँटेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 20 लाखांचं चोरी केलेलं सोनं जप्त

चोरीस गेलेले दागिने आठ वर्षानंतर मिळाले, आर्थिक अडचण असताना पोलिसांची मोठी कामगिरी

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.