नशीबच खराब! मदतीसाठी आलं हेलिकॉप्टर, पण गावकऱ्यावर काळाचा घाला, वरून टाकलेलं पॅकेट…

अनेकदा असं होतं की, कठीण काळात मदतीसाठी उभी राहणारी एक तरी व्यक्ती असतेच, अनेकदा असं देखील होतं, जेव्हा नशीब साथ देत आहे. एका गावकऱ्यासोबत देखील असं झालं आहे. त्याच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर आलं पण..., जाणून घ्या नेमकं काय घडलं.

नशीबच खराब! मदतीसाठी आलं हेलिकॉप्टर, पण गावकऱ्यावर काळाचा घाला, वरून टाकलेलं पॅकेट...
| Updated on: Oct 03, 2026 | 11:05 AM

आकाशात हेलिकॉप्टर उडत होता आणि जमिनीवर पूरात अडलेली लोकं हेलिकॅप्टरच्या प्रतिक्षेत होते. कारण अशा कठीण प्रसंगात फक्त हेलिकॅप्टरच त्यांच्या मदतीसाठी येऊ शकत होतं. कोणाला अन्नाचं पॅकेट हवं होतं, तर कोणाला पिण्याचं पाणी, कोणाला फक्त एवढ्याच गोष्टीवर विश्वास होता आणि तो म्हणजे कोणीतरी त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलं आहे… त्यानंतर अचानक आकाशातून पॅकेट पडू लागले. त्यानंतर गावकरी पॅकेट पकडण्यासाठी प्रयत्न करु लागले. याच दरम्यान, एका 60 वर्षीय अनिल कुमार यांच्यावर पॅकेट पडला, पण के अनिल यांना सांभाळता आलं नाह आणि अन्य पॅकेट देखील त्यांच्यावर कोसळले.

अनिल यांच्या कुटुंबियांचं असं देखील म्हणणं आहे की, काही पाकिटं त्यांच्या छातीवरही पडली आणि त्यानंतर गावात एकच गोंधळ उडाला. अनिल कुमार सिंग, ऊर्फ अप्पू सिंग, यांचा जागीच मृत्यू झाला.

Loading...

संबंधित घटना बिहारच्या सारण जिल्ह्यातील अमनौर पोलीस ठाणे हद्दीतील परशुरामपूर गावाची आहे. या गावामध्ये सध्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते पाण्यात बुडाले आहेत. अनेक भाग मुख्य रस्त्यांपासून तुटले आहेत. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. सांगायचं झालं तर, नेपाळमधून आलेल्या पुराचा फटका सारण जिल्ह्यातील अनेक भागांना बसला आहे.

मकेर, अमनौर आणि परसासह अनेक प्रखंड प्रभावित असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक गावांची अवस्था अशी झाली आहे की ती चारही बाजूंनी पाण्याने वेढली जाऊन बेटांसारखी झाली आहेत. याच कारणामुळे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरग्रस्त भागात कोरडे अन्नधान्य पोहोचवले जात होते. हेलिकॉप्टर गावांवरून जात होते आणि खाली असलेल्या लोकांमध्ये मदतीचे पॅकेट्स टाकले जात होते. परशुरामपूरमध्येही लोक याच प्रतीक्षेत होते. त्यांना कदाचित अंदाज नसेल की, काही मिनिटांनंतर याच मदत सामग्रीमुळे गावातील एका घरात शोककळा पसरेल.

संतापलेल्या लोकांनी रस्त्यावर ठेवला मृतदेह

अनिलच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावातील संताप अनावर झाला. पुरामुळे त्रस्त असलेले लोक आधीच अडचणीत होते. त्यातच मदत सामग्री घेताना एका वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे लोकांचा रोष आणखी वाढला. गावकऱ्यांनी अनिल सिंगचा मृतदेह रस्त्यावर ठेवला आणि रस्ता बंद केला. तासन्तास वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेतला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी छपरा सदर रुग्णालयात पाठवला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us