AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Street off Hormuz : इराणची अखेर माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज जगासाठी पुन्हा ओपन, अराघची यांची सर्वात मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर इराणने माघार घेतली आहे. युद्धविरामानंतर आता इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज संपूर्ण जगासाठी ओपन करण्यात आला आहे. यामुळे मोठं ऊर्जा संकट टळलं आहे.

Street off Hormuz :  इराणची अखेर माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज जगासाठी पुन्हा ओपन, अराघची यांची सर्वात मोठी घोषणा
सैय्यद अब्बास अराघचीImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 7:24 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारी पासून युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल 39 दिवस चाललं, अखेर 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान युद्धकाळात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज जहाजांसाठी बंद केल्यानं संपूर्ण जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे. त्यातील सुमारे 25 टक्के वाहातूक याच मार्गाने होते, दरम्यान त्यानंतर अमेरिकेनं इराणसोबत युद्धविरामाची घोषणा करतानाच ही अट घातली होती की, स्ट्रेट ऑफ होर्मूज तातडीने जगासाठी ओपन करावा. मात्र युद्धविरामानंतर देखील इस्त्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच होते, त्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज पूर्णपणे ओपन केला नव्हता. दिवसभरात केवळ 15 जहाजांनाच या मार्गाने जाण्याची परवानगी होती. त्यामुळे ऊर्जा संकट टळलं नव्हतं.

मात्र गुरुवारी इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम झाला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने हा युद्धविराम झाला. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताच आता इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इराणने आता संपूर्ण जगासाठी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू केला आहे, इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत घोषणा केली आहे. इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कच्च्या तेलाचे दर कमी होणार? 

युद्धकाळामध्ये इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. याचा भारताला देखील मोठा फटका बसला होता. देशात एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कच्च्या तेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र आता स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. तसेच कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा देखील दूर होणार असून पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...