दिल्लीतील हॉटेलला भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील हॉटेलला भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथील करोल बाग परिसरातील हॉटेल अर्पित पॅलेसला भीषण आग लागली. हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली. या भीषण आगीत होरपळून लहान मुलासह 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. आग लागल्याने हॉटेलमधील लोक घाबरले आणि मिळेल त्या दिशेने जीव वाचवण्यासाठी पळायल्या लागले. इतकंच नाही लोकांनी प्राण वाचवण्यासाठी इमारतीवरुन खाली उड्या मारल्या.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पित पॅलेसमध्ये लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग पूर्णपणे विझवण्यात आली असून मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

करोल बाग परिसरातील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्याला सुरुवात झाली. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आतापर्यंत या आगीतून 25 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, यात 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

या हॉटेलमध्ये 40 खोल्या आहेत. या हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 26 गाड्या लागल्या. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज अग्निशनम दलाने वर्तवला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *