FSSAI कडून मोठा दणका, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर प्लांटवर छापा, थेट..

FSSAI ने बिसलेरी कंपनीला मोठा दणका दिला. त्यातच आता मोठी कारवाई करण्यात आली. राज्य अन्न सुरक्षा विभागाच्या एका पथकाने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर तयार करणाऱ्या एका युनिटची तपासणी केली. तिथे त्यांनी 2 हजाराहून अधिक पिण्याच्या बाटल्या जप्त केल्या.

FSSAI कडून मोठा दणका, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर प्लांटवर छापा, थेट..
FSSAI
| Updated on: Nov 25, 2026 | 12:37 PM

बिसलेरी कंपनी गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आली. हेच नाही तर बिसलेरीचे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे काही चाचण्यांवरून स्पष्ट झाले. त्यातच कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले घटकही आढळून आले. बिसलेरी कंपनीने दावा केला की, आमचे पाणी पिण्यास योग्य आहे. बिसलेरी हा देशातील मोठा पिण्याच्या पाण्याचा पॅकेज्ड ब्रँड आहे. जवळपास ठिकाणी आपल्याला बिसलेरीचे पाणी बघायला मिळते. मात्र, हेच पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट झाल्याने एकच मोठी खळबळ उडाली. बिसलेरीच्या पाण्यात कॅन्सर होणारा घटक असल्याचे चाचणीत पुढे आल्यानंतर आरोग्याशी खेळ सुरू होता, हे स्पष्ट झाले. FSSAI ने रविवारी बिसलेरीच्या विरोधात कोर्टात केस चालवण्यास मंजूरी दिली. या बाटलीबंद पाण्याचे नमूने दोनदा चाचणीत फेल झाले आहेत.

आमचे पाणी पिण्यास योग्यच असल्याचे बिसलेरी कंपनीने म्हटले. पण दोन्ही चाचणीत त्यांचे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच आता अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई सुरू केली. झांसीमध्ये अन्न सुरक्षा विभागाने पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेच्या संदर्भात मोठी कारवाई केली आहे.

Loading...

त्यामुळे अडचणीत वाढ झाली. राज्य अन्न सुरक्षा विभागाच्या एका पथकाने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर तयार करणाऱ्या एका युनिटची तपासणी केली. तिथे त्यांनी 2 हजाराहून अधिक पिण्याच्या बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांवर अशा नावाचा वापर करण्यात आला होता, जे एका सुप्रसिद्ध ब्रँडच्या नावाशी मिळतेजुळते आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे होते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) या कारवाईबाबतची माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. FSSAI नुसार, तपासणीदरम्यान या युनिटमध्ये स्वच्छता आणि उत्पादनाच्या लेबलिंगशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अगोदर बिसलेरी ही कंपनी अडचणीत सापडली आहे. त्यातच आता पॅकेज्ड बंद इतर कंपन्यांवरही कारवाई केली जात आहे. FSSAI ने बिसलेरीच्या पाण्यावर मोठा प्रश्न उपस्थित केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us