AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane Field Fire: ऊसाला आग लागू नये म्हणून काय करावे? ऊस जळाल्यास अगोदर करा हे काम

Sugarcane Field Fire: गेल्या काही दिवसात राज्यात ऊसाला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. दुष्काळात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ऊसाला आग लागू नये यासाठी काही उपाय योजना करणे आवश्यक आहे.

Sugarcane Field Fire: ऊसाला आग लागू नये म्हणून काय करावे? ऊस जळाल्यास अगोदर करा हे काम
ऊसाला आग लागू नये म्हणून काय करावे? ऊस जळाल्यास अगोदर करा हे काम
| Updated on: Nov 25, 2026 | 12:34 PM
Share

Sugarcane Field Fire: राज्यात अनेक ठिकाणी ऊसाला आग लागण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत. एकदा ऊसाला आग लागली की ती काही मिनिटांतच शेतात पसरते आणि त्यात ऊस जळून खाक होतो. त्यामुळे आग आटोक्यात आणणे जिकरीचे ठरते. त्यामुळे आग लागूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे. शेतात आणि शेताच्या भोवताली अग्निरोधक पट्टा तयार करणे, पालपाचोळा आणि पाचटाचे व्यवस्थापन करणे तसेच लोंबकाळलेल्या वीज तारांविषयी उपाय योजना करणे आवश्यक आहे. तसेच आग विझवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे ठरते.

या कारणांमुळे लागते आग

ऊसाच्या शेतात वीजवाहून नेणाऱ्या तारांमध्ये घर्षण झाल्यावर, तारा एकमेकांना चिकटल्यावर घर्षणातून ठिणग्या पडतात आणि आग लागते. वारा, वावटळीमुळे सुद्धा तारांमध्ये बिघाड होऊन ठिणगी पडू शकते. तसेच विहिरीवरील विद्युत पंपाच्या जोडणीत बिघाडाने शॉर्टसर्किटची भीती असते. त्यातून आग लागू शकते. बांधावरील गवत, पालापाचोळा आणि इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मग आग लागू शकते.

मजूर अथवा शेतकऱ्याला विडीकाडीची सवय असेल तर मग धोका वाढू शकतो. अथवा शेतात शेकोटी पटवल्यास, चुल पेटवल्यास आणि योग्य काळजी न घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. दुष्काळात वणवा भडकण्याची भीती असते. तर पावसाळ्यात वीज पडून आग लागण्याची भीती असते. कधी कधी ट्रॅक्टर, हार्वेस्टरचा गरम भाग कोरड्या पाचटाच्या संपर्कात आल्यास आग लागू शकते.

आग लागू नये म्हणून काय कराल?

शेताच्या बांधावर वाळलेले गवत, काटक्या आणि कचरा, गोवऱ्या गोळा करा. शेतात नियमित स्वच्छता ठेवा.

शेतात बिडीकाडी, सिगारेट, व्यसन करणे टाळा. चुल पेटवल्यास ती दूर असावी. ती बंदिस्त असणे आवश्यक आहे.

शेकोटी पेटवू नका. नाही तर ठिणगी उडून मोठी दुर्घटना घडू शकते.

ऊसाच्या शेताच्या कडेला साधारण 3 ते 5 मीटर रूंदाचा पट्टा ठेवा. ऊसाच्या शेतातही ठराविक अंतराचे असे पट्टे असणे आवश्यक आहे. यामुळे आग जास्त भडकणार नाही.

लोंबकाळणाऱ्या तारांविषयी अगोदरच तक्रार करा. महावितरणकडे दुरुस्तीची मागणी करा. तुटलेल्या तारा असतील तर त्याची तात्काळ तक्रार करा.

ऊसाच्या चरीत ओलावा ठेवण्याचा प्रयत्न करा. सुकलेले पाचट लवकर काढून त्याचे योग्य व्यवस्थापन करा.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी
नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, दिपके नागपूरला रवाना
CJP Protest : नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, अभिजित दिपके नागपूरला रवाना
राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा...
Raj thackeray : राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी....
Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?