भाजपच्या माजी नगरसेवकाची पत्नीसह दोन मुलांना विष पाजून आत्महत्या, चिठ्ठी लिहीली असल्यामुळे सत्य आलं उजेडात

| Updated on: Jan 27, 2023 | 1:30 PM

भाजपाचे विदिशा मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह चौहान यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. त्यामध्ये त्यांनी दुश्मनाच्या मुलांना सुद्धा असा आजार होऊ नये असं म्हटलं आहे.

भाजपच्या माजी नगरसेवकाची पत्नीसह दोन मुलांना विष पाजून आत्महत्या, चिठ्ठी लिहीली असल्यामुळे सत्य आलं उजेडात
Crime News
Image Credit source: Google
Follow us on

मध्यप्रदेश – भाजपच्या माजी नगरसेवकाने (bjp corporator) पत्नीसह दोन मुलांना विष पाजून आत्महत्या (suicide) केल्यामुळे मध्यप्रदेशात (madya pradesh) सगळीकडे चर्चा आहे. दोन्ही मुलांच्या आजारा कंठाळून त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे सापडलेल्या चिठ्ठीत लिहीले आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली तेव्हापासून परिसरात एकदम शांतता पसरली आहे. ही घटना विदिशा शहरातील बंटी नगरमधील आहे. संजीव मिश्रा हे विदिशा नगरात नगरसेवक राहिले आहेत.

भाजपाचे विदिशा मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह चौहान यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. त्यामध्ये त्यांनी दुश्मनाच्या मुलांना सुद्धा असा आजार होऊ नये असं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली, त्यावेळी संजीव मिश्रा, नीलम मिश्रा, अनमोल आणि सार्थक यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक गर्दी केली होती. हॉस्पीटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

विदिशाच्या जिल्हाधिकारी उमाशंकर भार्गव यांनी नगरसेवकांच्या दोन्ही मुलांना डीएमडी आजार असल्याचं सांगितलं आहे. तो अनुवंशिक आजार असल्यामुळे त्याच्यावर उपचार करता येत नाहीत असं सुध्दा सांगितलं आहे. आत्महत्या करण्याच्या आगोदर त्यांनी एक पत्र सुद्धा लिहिलं होतं. ते पोलिसांना सापडलं आहे. मी माझ्या मुलांना वाचवू शकत नाही, त्यामुळं कुटुंबियांना विष देऊन आत्महत्या करीत आहोत.