AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rates : सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ, आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, 52 हजारांनी स्वस्त, काय आहेत नवे दर?

सराफा बाजारातून मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याच्या दरात प्रचंड घसरण झाली असून, गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे.

Gold Rates : सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ, आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, 52 हजारांनी स्वस्त, काय आहेत नवे दर?
Gold and silver ratesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 3:07 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात तर सातत्याने घसरण सुरूच असून, यामुळे लग्नसराईत सोन्याची खरेदी करणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे, त्यांना तर मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे ज्यांनी यापूर्वीच सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे, ते मात्र चांगलेच अडचणीत सापडले असून, त्यांची चिंता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याचे दर आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. मात्र आता सोन्याच्या दर झपाट्याने कमी होत आहेत. चांदीच्या किमती देखील घसरल्या आहेत, त्यामुळे आता सोन्याच्या घसरणीला कधी ब्रेक लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच अशा स्थितीमध्ये सोन्याची खरेदी करावी की करू नये? असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

सोन्याच्या दरात प्रचंड घसरण

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याचे दर गगनाला भिडले होते. सोन्याचे दर ऐकूनच गुंतवणूकदारांना धडकी भरत होती. 29 जानेवारी 2026 या दिवशी सोन्याचे दर हे आतापर्यंतच्या सर्वोच्च स्थानावर 1 लाख 93 हजार 096 रुपयांवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. MCX वर जानेवारीपासून ते ऑक्टोबरपर्यंत सोन्याच्या दरात तब्बल 51 हजारांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावाची देखील अशीच स्थिती आहे. चांदीचे दर जानेवारीमध्ये 4,20,048 रुपयांवर पोहोचले होते. ते आता 2 लाख 33 हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

सोन्याचे दर वाढणार का?

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवल्यामुळे सोन्याच्या दरावर दबाव पाहायला मिळत आहे. जर व्याज दरात कोणताही बदल झाला नाही तर सोन्याचे सध्याचे दर हे प्रति तोळा 1 लाख 42 हजार रुपयांच्या आसपास असू शकतात. परंतु जर अचानक कच्चा तेलाच्या किमती वाढल्या, डॉलर अधिक मजबूत झाला तर मात्र सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू शकतात. मात्र सध्या तरी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे सोने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान