AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याच्या पैशांवर ऐश केली, त्याच बिझनेसमेनला मॉडेलनं अडकवलं जाळ्यात, पण संपूर्ण खेळ तिच्याच विरोधात पलटला, प्रकरण नेमकं काय?

बिझनेसमेनला जाळ्यात अडकल्यानंतर प्रसिद्ध मॉडेल स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आधी मॉडेलने बिझनेसमेनच्या पैशांवर ऐश केली. परदेशात फिरायला देखील गेली. पण त्यानंतर तिच्या विरोधाच संपूर्ण खेळ पलटला...

ज्याच्या पैशांवर ऐश केली, त्याच बिझनेसमेनला मॉडेलनं अडकवलं जाळ्यात, पण संपूर्ण खेळ तिच्याच विरोधात पलटला, प्रकरण नेमकं काय?
| Updated on: Oct 30, 2026 | 3:06 PM
Share

ग्लॅमरच्या विश्वातून कामय धक्कादायक गोष्ट समोर येत असतात. सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने मॉडेलचे लैगिंक आत्याचार करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर अल्या. पण आता उलट झालं आहे, मॉडेलनेच एका बिझसनेसमेनला स्वतःच्या जाळ्यात अडकवल्याची माहिती समोर येत आहे. पण हे प्रकरण आता तिच्यासाठी वादग्रस्त ठरलं आहे. मॉडेल विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली असून, गंभीर प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. तर जाणून या प्रकरणी नेमकं काय झालं आहे..

समोर आलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध मॉडेल विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बिझनेसमेनला हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप मॉडेलवर आहे. याप्रकरणी आता पोलीस चौकशी करत आहेत.

याप्रकरणी, ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात बिझनेसमेनच्या तक्रारीवरून प्रसिद्ध मॉडेलविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनीट्रॅपमध्ये अडकवून बदनामी आणि खोट्या गुन्ह्यांची धमकी देत 1 कोटी 39 लाख रुपये उकळल्याचा आरोप मॉडेलवरन आहे.

बिझनेसमेनने केलेल्या तक्रारीनुसार, आलिशान फ्लॅट, एमजी हेक्टर कार, बंगळुरूमधील मालमत्ता, ऑफिससाठी जागा आणि परदेश दौऱ्यांचा खर्च बिझनेसमेनकडून करवून घेतल्याचे आरोप FIR मध्ये दाखल करण्यात आले आहेत. बँकॉक, व्हिएतनाम, जॉर्जिया आणि बाकूसह विविध परदेश दौऱ्यांसाठीही बिझनेसमेनकडून पैसे घेतल्याचे आरोप देखील मॉडेलवर करण्यात आले आहेत,

समोर येत असलेल्या माहितीनुसार, बिझनेसमेनच्या आधी मॉडेलने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलेली. मॉडेलने बिझनेसमेनविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात पाठलाग, मारहाण आणि बलात्काराचे गुन्हे दाखल केले असून हे गुन्हे दबाव टाकण्यासाठी केल्याचा तक्रारदाराच्या वकिलांनी दावा केला आहे. संबंधित मॉडेलचे सोशल मीडियावर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, कापूरबावडी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

एवढंच नाही तर, असं देखील कळत आहे की, आरोपी महिलेकडे बिझनेसमेनचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ होते. ते सोशल मीडियावर किंवा इतरत्र लीक करण्याची आणि खोट्या पोलीस केसेसमध्ये अडकवण्याची धमकी मॉडेल देत होती. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अशात याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आह.

Follow Us
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान