AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम पूर्णेकर आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात वातावरण तापले आहे. हत्येला एक महिना उलटूनही मारेकऱ्यांना अटक न झाल्याने पूर्णेकर कुटुंबीय न्यायासाठी आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटानेही त्यांना पाठिंबा दिला आहे. राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी करत पोलीस व मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागितला आहे. कुटुंबीय मुख्य आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करत आहेत.

Ram Purnekar :  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम पूर्णेकर आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
| Updated on: Oct 30, 2026 | 3:03 PM
Share

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटून गेला असला, तरी या प्रकरणावरून ठाण्यातील वातावरण अद्याप तापलेलं आहे. वडिलांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत न्यायासाठी आवाज उठवला होता. दरम्यान, काल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. दुसरीकडे, या हत्या प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. पूर्णेकर कुटुंबीयही या मागणीवर ठाम आहे.

दरम्यान काल पोलिसांनी पूर्णेकर आंदोलकांना, समर्थकांना ताब्यात घेतलं होतं, त्यांना अमानुष मारहाण केली असा आरोप करण्यात आला, तसेच आणखीही काही गंभीर आरोप करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी पुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राम पूर्णेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

काय म्हणाले राम पूर्णेकर?

काल पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आणि समर्थकांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. यासंदर्भात राम पूर्णेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी पोलिसांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. “आमचे जे वकील सोबत आले होते, त्यांनी एक पत्र दिलं आहे. ज्यांनी हे कृत्य केलं आहे, त्यांना डीसीपी साहेबच शिक्षा देतील. आपण या प्रकरणात कायदेशीर मार्गाने पुढे जाऊया. यामुळे आपण सर्व पोलिसांना बदनाम करू शकत नाही,” असं राम पूर्णेकर म्हणाले. तसेच, पोलिस योग्य ती कारवाई करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी पोलिसांकडे एक महत्त्वाची विनंती केली. “आमचे जे समर्थक आहेत, त्यांना अटक करू नका. या प्रकरणातील मुख्य कलप्रीट मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे या दोघांना अटक करा,” अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात डीसीपी साहेबांशी आपलं बोलणं झालं असून त्यांना संपूर्ण माहिती दिल्याचंही राम यांनी सांगितलं. या प्रकरणात कठोर भूमिका घेणार असल्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय मागणी?

या प्रकरणावरून राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही न्यायाची मागणी केली आहे. “मुख्यमंत्र्यांना मी एवढंच सांगेन की, साहेब, ठाण्यामध्ये जे सुरू आहे ते खूप चुकीचं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना तुम्ही अटक करा, बाकीच्यांना जाऊ द्या,” असं ते म्हणाले.

वडिलांच्या हत्येला महिना उलटूनही न्यायासाठी सुरू असलेला पूर्णेकर कुटुंबीयांचा संघर्ष अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान