Gen Z ची आवडती एनर्जी ड्रिंक बाजारातून का हटवल्या जातायत? खरंच हे पेय आरोग्यासाठी धोकादायक आहे?

Gen z ची आवडत्या एनर्जी ड्रिंक बाजारातून हळूहळू हटवल्या जात असल्याचे समोर येत आहे. आता FSSI ने या ड्रिंकबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Gen Z ची आवडती एनर्जी ड्रिंक बाजारातून का हटवल्या जातायत? खरंच हे पेय आरोग्यासाठी धोकादायक आहे?
| Updated on: Aug 01, 2026 | 9:51 AM

भारतात विक्री केल्या जाणाऱ्या उच्च-कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंकच्या विरोधात सरकार कठोर पावले उचलताना दिसत आहे. FSSI ने Sting, Red Bull, Monster, Campa Energy आणि अन्य कंपन्यांना त्यांच्या उत्पादनावर एनर्जी ड्रिंक किंवा इतर समानार्थी शब्द वापरण्यास बंदी घातली आहे. भारतात एनर्जी ड्रिंकसाठी विशेष फुड स्टँडर्ड नाही. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असं सरकारचं म्हणणं आहे. या निर्णयाचा अनेक कंपन्यांनी विरोध केला आहे. परंतु सरकारने कठोर पावले उचलण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. कंपन्यांना नियम लागू करण्यासाठी 90 दिवसांचा अवधी दिला आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत कंपन्यांनी या निर्णयाने होणार्‍या नुकसानीविषयी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या पेयाची ओळख एनर्जी ड्रिंक म्हणून झाली आहे. आता अचानक लेबल बदलल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. FSSAI च्या सीईओने स्पष्ट केलं की, जर कंपन्यांना या निर्णयावर आक्षेप असल्यास ते कोर्टात जाऊ शकतात. आता नियमांचं पालन करावं लागेल. रिपोर्टनुसार, 90 दिवसांत हे पेय नव्या लेबलने विक्री करण्यासाठी सहमती दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे.

FSSAI चं म्हणणं आहे की, भारतात एनर्जी ड्रिंकसाठी कोणतीही विशेष मानके नाहीत. त्यामुळे शरीर आणि मेंदूला उर्जा देणारा दावा करणे दिशाभूल करणारे ठरेल. त्यामुळे कंपन्यांना या पेयावरील लेबल काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाचा जगातील आणि भारतातील अनेक मोठ्या कंपन्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यात स्टिंग, रेड बुल, मॉन्स्टर बेव्हरेज, कॅम्पा एनर्जी, हेल एनर्जी यांसारख्या ब्रँडचा समावेश आहे. कंपन्या हे पेय एनर्जी ड्रिंक म्हणून विक्री करते.

एकीकडे भारतात एनर्जी ड्रिंकची (Energy Drink) बाजारपेठ वेगाने वाढत आहे. एका रिपोर्टनुसार, 2028 सालापर्यंत ही बाजारपेठ 1.6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. त्यात वार्षिक सुमारे 12.6 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगण्यात आहे. विशेष म्हणजे या पेयाची मागणी छोट्या छोट्या शहरातही वाढत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us