AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Godhra Local Body Election Results 2021 : गोध्रा नगरपरिषदेत MIM चा धमाका, भाजपची सत्ता उलथवली

गोध्रा नगरपरिषदेवर एमआयएमनं अपक्षांच्या साथीनं सत्ता स्थापन केली आहे. AIMIM Godhra Municipal council

Godhra Local Body Election Results 2021 : गोध्रा नगरपरिषदेत MIM चा धमाका, भाजपची सत्ता उलथवली
गोध्रा नगरपालिकेत एमआयएमची सत्ता
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 17, 2021 | 7:37 PM
Share

मुंबई: गुजरातमध्ये 2002 साली गोध्रा हत्याकांड झाल्यानं गोध्रा शहर चर्चेत आलं होतं. आता गोध्रा नगरपरिषदेवर एमआयएमनं अपक्षांच्या साथीनं सत्ता स्थापन केली आहे. एमआयएमनं अपक्षांना बरोबर घेत गोध्रा नगरपरिषदेतील भाजपची सत्ता हस्तगत केली आहे. गोध्रा नगरपरिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी ट्विट केले आहे. (AIMIM came in power at Godhra Municipal council with help of independent members)

वारिस पठाण यांचं ट्विट

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी गोध्रामध्ये सत्ता स्थापन करणं हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे. वारिस पठाण यांनी भाजपकडून सत्ता खेचून आणल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. एमआयएमनं गुजरातमध्ये गोध्रात सत्ता स्थापन करुन यशस्वी सुरुवात केली असल्याचं पठाण म्हणाले आहेत.

एमआयएमला गुजरातमध्ये चांगलं यश

गुजरातमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामध्ये एमआयएमनं चांगलं यश मिळवलं होते. गोध्रा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला 18 , काँग्रेसला 1, एमआयएमला 7 आणि अपक्षांना 18 जागांवर विजय मिळाला होता. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी गोध्रामध्ये प्रचार देखील केला होता.

अरवल्लीच्या मोडासामध्ये एमआयएमकडे विरोधी पक्षनेतेपद

अरवल्लीच्या मोडासा नगरपालिकेत एमआयएमने 8 जागा जिंकल्या आहेत. या ठिकाणी एमआयएमने अवघे 12 उमेदवार उभे केले होते. या पैकी 8 जागा एमआयएमने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे मोडासा नगरपालिकेतील काँग्रेसकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपदही एमआयएमने स्वत:कडे खेचून आणलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तंबूत खळबळ उडाली आहे. अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत.

गोध्रा नगरपालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप: 18

काँग्रेस : 01

एमआयएम: 07

अपक्ष : 18

संबंधित बातम्या

बिहारमध्ये एमआयएमचे 5 आमदार नितीश कुमारांच्या भेटीला, असदुद्दीन ओवैसींना झटका बसणार?

उत्तर प्रदेशची आतापासूनच तयारी, मोदी-योगी विरूद्ध ‘बहणजी’ ‘भाई’!

(AIMIM came in power at Godhra Municipal council with help of independent members)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली