बिहारमध्ये एमआयएमचे 5 आमदार नितीश कुमारांच्या भेटीला, असदुद्दीन ओवैसींना झटका बसणार?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घोषणा केलीय. मात्र, त्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

बिहारमध्ये एमआयएमचे 5 आमदार नितीश कुमारांच्या भेटीला, असदुद्दीन ओवैसींना झटका बसणार?

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घोषणा केलीय. मात्र, त्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. बहुजन समाज पार्टी आणि लोक जनशक्ति पार्टीनंतर आता असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाला झटका बसण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये या निवडणुकीत एमआयएमला मोठं यश मिळत त्यांचे 5 आमदार निवडून आले. मात्र, या पाचही जणांनी नितीश कुमार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. या भेटीनंतर बिहारमध्ये एमआयएमला मोठा झटका लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे (AIMIM Bihar MLA meet CM Nitish Kumar amid Cabinet Expansion).

याआधी बसपाच्या (BSP) एकमेव आमदाराने संयुक्त जनता दलात (JDU) प्रवेश केला होता. त्यामुळे बसपाने आपला बिहारमधील एकमेव आमदारही गमावला. हा बसपासाठी चांगलाच झटका होता. यानंतर लोक जनशक्ती पक्षाच्या (LJP) एकमेव आमदाराने देखील नितीश कुमार आणि जेडीयू नेत्यांच्या भेटीच्या तयारीत आहेत. त्यातच आता एमआयएमच्या आमदारांनी नितीश कुमार यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे एमआयएमचे 5 आमदार एमआयएमच्या बिहार प्रदेशाध्यक्षांसह नितीश कुमार यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

एलजेपीचे आमदार राज कुमार सिंह नितीश कुमार यांचे निकटवर्ती मंत्री अशोक चौधरी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचल्यानंतर बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. चौधरींनी मात्र राज कुमार सिंह यांची भेट सामान्य असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे या भेटीमागील कारणही गुलदस्त्यातच आहे. मात्र, याआधी बसपाच्या आमदारांनी जेडीयूत प्रवेश केलेला असल्याने या भेटीसत्रातील आमदार देखील जेडीयूत प्रवेश करणार अशी चर्चा आहे.

बिहारमध्ये लवकरच नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदारांच्या या भेटींनी चर्चांना उधाण आलंय. त्यामुळेच JDU बिहार BSP आणि LJP नंतर एमआयएमला मोठा झटका देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

बिल गेट्स बिहारचं कौतुक करतात,अमेरिकेतील बिहारी उद्योजकांनी मातृभूमीच्या विकासात साथ द्यावी: नितीश कुमार

बिहारमधील रुग्णालयांत आता ‘दीदी की रसोई’; रुग्णांना मिळणार सकस आहार

भाजप मित्र की दुश्मन? बिहारमध्ये शिवसेनेच्या भूमिकेत नितीशकुमार

व्हिडीओ पाहा :

AIMIM Bihar MLA meet CM Nitish Kumar amid Cabinet Expansion

Published On - 1:01 am, Fri, 29 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI