बिल गेट्स बिहारचं कौतुक करतात,अमेरिकेतील बिहारी उद्योजकांनी मातृभूमीच्या विकासात साथ द्यावी: नितीश कुमार

नितीशकुमार यांनी अमेरिकेतील बिहारी उद्योजकांना राज्यात उद्योग स्थापन करण्याचं आमंत्रण दिलं आहे. (Nitish Kumar Bihari Businessman in USA)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:38 PM, 17 Jan 2021
बिल गेट्स बिहारचं कौतुक करतात,अमेरिकेतील बिहारी उद्योजकांनी मातृभूमीच्या विकासात साथ द्यावी: नितीश कुमार
नितीश कुमार

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या बिहारी उद्योजकांना साद घातली आहे. मातृभूमीच्या विकासासाठी योगदान देण्याचं आवाहन नितीश कुमार यांनी केले आहे. मातृभूमी बिहारचा विकास करण्यासाठी राज्यात उद्योग स्थापन करा, सहकार्य करु, अशा स्वरुपाची साद नितीश कुमारांनी बिहारी उद्योजकांना घातली आहे. नितीश कुमार बिहार झारखंड असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होते. अमेरिकेत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांशी नितीश कुमारांनी संवाद साधला. (Nitish Kumar invite Bihari Businessman in USA for investment in Bihar)

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अमेरिकेतील बिहारी उद्योजकांना तुम्ही बिहारी कुटुंबाचा भाग असल्याचं म्हटलं आहे. बिहारमध्ये उद्योग स्थापन करण्याची इच्छा असेल तर राज्य सरकार तुम्हाला मदत करण्यास तयार असल्याचं आश्वासन नितीश कुमारांनी दिले. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन हवी असेल तर उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या समस्या असतील त्या देखील सोडवल्या जातील. राज्यात उद्योग स्थापन करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असंही नितीश कुमारांनी सांगितले.

बिहार पाहायला या

नितीश कुमारांनी बिहारमधील परिस्थिती बदलल्याचे सांगितले. बिहारच्या गावागावात विकासाची कामं होत आहेत. राज्याची राजधानी पाटणा शहराचा विस्तार झाला आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय संग्रहालय बनवलं जात आहे. बिहारच्या पोलीस मुख्यालयाची इमारत आणि बदललेलं बिहारचं रुप पाहण्यासाठी या, असं आवाहन देखील नितीश कुमारांनी केले.

बिहारच्या विकासात देशाचा विकास

अमेरिकेतील बिहारी उद्योजकांनी आपल्या राज्यात गुंतवणूक केली, उद्योग स्थापन केले तर बिहार सोबत देशाचा पण विकास होईल. बिहारच्या पर्यावरणाचं कौतुक मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस करतात. आपण एकदा बिहारमध्ये उद्योग स्थापन करण्याविषयी विचार करावा, बिहार फाऊंडेशन आता मुख्यंमत्री कार्यालयाच्या संपर्कात असेल, असंही म्हटलं.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

‘बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा’, बिहार निवडणूक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

(Nitish Kumar invite Bihari Businessman in USA for investment in Bihar)