AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप मित्र की दुश्मन? बिहारमध्ये शिवसेनेच्या भूमिकेत नितीशकुमार

नितीश कुमार (Nitish Kumar slams BJP) यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर विश्वासघातकी असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे.

भाजप मित्र की दुश्मन? बिहारमध्ये शिवसेनेच्या भूमिकेत नितीशकुमार
नितीश कुमार यांचा भाजपवर हल्लाबोल
| Updated on: Jan 11, 2021 | 1:46 PM
Share

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार (JDUs Nitish Kumar) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. निवडणुकीदरम्यान दोस्त कोण आणि दुश्मन कोण याचा पत्ताच लागला नाही, असं नितीश कुमार म्हणाले. नितीश कुमार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर विश्वासघातकी असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. जेडीयूची दोन दिवसीय बैठक सुरु आहे. या बैठकीत नितीश कुमारांच्या पराभूत उमेदवारांनी थेट भाजपला कारणीभूत धरत विश्वासघाताचा आरोप केला. त्यामुळे बिहारमध्ये सध्या नितीश कुमार हे शिवसेनेच्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे. (Nitish Kumar said Failed to differentiate between friends and enemy, slams BJP)

“भाजपने निवडणुकीत वेगळाच गेम केला. समोर आम्ही सोबत असल्याचं दाखवलं पण पडद्यामागे वेगळीच खेळी केली. हे म्हणजे पाठीत वार करण्यासारखे आहे. आमचा पराभव मित्रपक्षामुळेच अर्थात भाजपमुळेच झाला”, असं जेडीयूचे पराभूत उमेदवार म्हणाले.

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

या बैठकीत नितीश कुमार यांनी आपण मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक नव्हतो असा पुनरुच्चार केला. मात्र आपण पक्ष आणि भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्रिपद स्वीकारलं असं त्यांनी सांगितलं. निवडणुकीदरम्यान मित्र कोण आणि शत्रू कोण हे समजलंच नाही असं म्हणत नितीश कुमारांनी आपल्या पराभूत उमेदवारांच्या सुरात सूर मिसळला.

नितीश कुमारांची भाजपविरोधात नाराजी

निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात होतो. मात्र त्याचवेळी संशयाचा धूर येत होता. NDA मध्ये पाच महिन्यांपूर्वीच सर्व विषयांवर चर्चा होणे आवश्यक होती, असं म्हणत नितीश कुमारांनी आता भाजपविरोधात नाराजी दर्शवण्यास सुरुवात केली आहे.

Nitish Kumar

जेडीयूची दोन दिवसीय बैठक

बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं. मात्र नितीश कुमार यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपद नको असं म्हणत पद नाकारलं होतं. पण भाजपच्या आग्रहास्तव नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र आता दोन्ही पक्षातील कुरबुरी समोर येत आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2020 मध्ये भाजपला 74, जेडीयूला 41 आणि लालूंच्या RJD ला 75 जागांवर विजय मिळाला होता.

 चिराग पासवान यांना मोहरा बनवलं  

दरम्यान, चिराग पासवान यांना भाजपने मोहरा बनवला असा आरोपही नितीश कुमारांच्या पराभूत उमेदवारांनी केला. आम्हाला मदत मिळेल अशी आशा होती, पण भाजपने विरोधकांनाच मदत केली असाही आरोप त्यांनी केला.

तूर्तास तरी NDA सोबत

दरम्यान, या बैठकीनंतर बिहारचं राजकारण ढवळून निघत आहे. मात्र तूर्तास आम्ही NDA सोबतच आहोत, असं स्पष्टीकरण जेडीयूचे लोकसभेतील गटनेते ललन सिंह यांनी दिले.

संबंधित बातम्या   

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

‘बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा’, बिहार निवडणूक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

(Nitish Kumar said Failed to differentiate between friends and enemy, slams BJP)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.