Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

तब्बल 18 तासांनी बिहार विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झालाय. अत्यंत चुरशीच्या या लढाईत ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली.

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 2:57 AM

Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : तब्बल 18 तासांनी बिहार विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झालाय. अत्यंत चुरशीच्या या लढाईत ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. मात्र, अखेर भाजप-जेडीयूच्या एनडीएने विधानसभेच्या  एकूण 243 जागांपैकी बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे 75 जागांवर विजय मिळवत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठीच्या बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने 74 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाची जागा घेतली. तर नितीशकुमारांचा संयुक्त जनता दलाने 43 जागांवर विजयाची नोंद केली. काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावं लागलं. (Bihar Election Result 2020)

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये महागठबंधन सर्वाधिक जागांवर यशस्वी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले. बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये कोण बाजी मारेल? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं.

तब्बल 18 तासांच्या चढउतारानंतर निकाल स्पष्ट

मंगळवारी (10 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर होता. बिहार निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या प्रचारसभांमुळे यावेळी भाजपचा पराभव होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मंगळवारी सकाळी मतमोजनी सुरु झाली तेव्हादेखील तेच चित्र होतं.

मतमोजणी सुरु होऊन जसजसा वेळ पुढे जाऊ लागला तसतसं भाजपचीदेखील आकडेवारी पुढे सरकू लागली. एनडीए सुरुवातील 60 ते 65 जागांवर आघाडीवर होती. मात्र, त्यानंतर एनडीएने मोठी मुसंडी मारली आणि थेट 100 चा आकडा गाठत आघाडी घेतली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास महागठबंधन आणि एनडीए दोन्ही आघाड्या जवळपास 100 जागांवर आघाडीवर होत्या.

दुपारनंतर एनडीए 122 पेक्षाही जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र होतं. मात्र, महागठबंधन 100 ते 110 जागांवर अडकून पडलं होतं. दुसरीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा नशिब आजमावणारा एमआयएम पक्ष यावेळी दोन जागांवर आघाडीवर दिसत होता. दुपारी 3 नंतर एमआयएमने दोन जागांवर विजयी झाल्याचं स्पष्टही झालं.

या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) पदरात हवा तसा विजय मिळाला नाही. जेडीयू पक्ष सुरुवातीपासून 40 ते 50 जागांवर आघाडीवर दिसत होता. पण 50 च्या पुढे जाऊ शकला नाही. विशेष म्हणजे दुपारी जेडीयूच्या एका नेत्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपलं अपयश स्वीकारही केलं.

एमआयएमचा पाच जागांवर विजय

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाला पाच जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे 2015 च्या निवडणुकीत एमआयएमला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दरम्यान, 2019 साली बिहारमध्ये एका पोटनिवडणुकीत एमआयएमने खातं खोललं होतं. त्यानंतर या निवडणुकीत एमआयएमला चांगलं यश मिळालं आहे.

मतदानाची टक्केवारी 

  • पहिला टप्पा – 53.54 टक्के
  • दुसरा टप्पा – 53 टक्के
  • तिसरा टप्पा – 55.22 टक्के

कोणाच्या किती रॅली?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी- 12
  • मुख्यमंत्री नितीश कुमार- 100
  • तेजस्वी यादव- 251
  • चिराग पासवान- 103
  • राहुल गांधी- 8
  • असदुद्दीन ओवैसी- 100

2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

  • राजद – 80
  • काँग्रेस – 27
  • जदयू – 71
  • भाजप – 53
  • लोजप – 2
  • रालोसप – 2
  • हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1
  • एकूण जागा – 243

(Bihar Vidhansabha Election Exit Poll Results)

?LIVE UPDATE?

[svt-event title=”भारतीय निवडणूक आयोगाची 1 वाजता (11 नोव्हेंबर) पत्रकार परिषद, बिहार निवडणुकीच्या निकालाबाबत देणार सविस्तर माहिती” date=”11/11/2020,12:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये एमआयएम किंगमेकर होण्याची शक्यता, 4 जागांवर विजय, तर एका ठिकाणी आघाडी” date=”10/11/2020,10:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निवडणूक आयोगाकडून 173 जागांचे निकाल घोषित, 56 जागांवरील विजयासह राजद सर्वात मोठा पक्ष” date=”10/11/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तिसऱ्यांदा पत्रकार परिषद” date=”10/11/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव, महागठबंधनची निवडणूक आयोगाकडे तक्रार” date=”10/11/2020,10:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नितीश कुमारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव, जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याचा राजदचा आरोप” date=”10/11/2020,9:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Bihar Election Result 2020 | निवडणूक आयोगाची 10 वाजता पत्रकार परिषद” date=”10/11/2020,8:37PM” class=”svt-cd-green” ] Bihar Election Result 2020 | निवडणूक आयोगाची 10 वाजता पत्रकार परिषद [/svt-event]

[svt-event title=”Bihar Election Result 2020 | 3 कोटी 40 लाख मतांची मोजणी पूर्ण, अजूनही 14 टक्के मतांची मोजणी बाकी” date=”10/11/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ] बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अजूनही सुरुच आहे. अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. अजूनही जवळपास 14 टक्के मतांची मोजणी बाकी आहे. तर आतापर्यंत एकूण 3 कोटी 40 लाख मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरी एनडीएची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत या बैठकीत चर्चा सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु” date=”10/11/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ] बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरु, सत्तास्थापनेच्या व्यूहरचनेची चर्चा, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचासह भाजपचे मोठे स्थानिक नेते आणि JDU चे नेते बैठकीत सहभागी, NDA-महाआघाडीत बहुमतासाठी चुरस [/svt-event]

[svt-event title=”Bihar Election Result 2020 LIVE | नितीश कुमार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक” date=”10/11/2020,8:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महागठबंधनला 113 जागांवर आघाडी, एनडीए 122 जागांवर पुढे” date=”10/11/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ] महागठबंधनला 113 जागांवर आघाडी, एनडीए 122 जागांवर पुढे ? एनडीए – 122 ?महागठबंधन – 113 ? BJP – 73 ? RJD – 75 ?JDU – 41 [/svt-event]

[svt-event title=”Bihar Election Result 2020 | शत्रुघ्न सिन्हांचा मुलगाच ‘खामोश’, लव सिन्हाला पराभवाचा धक्का” date=”10/11/2020,7:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Bihar Election Result 2020 LIVE | एनडीए-महागठबंधनमध्ये चुसशीची लढत” date=”10/11/2020,7:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”NDA आणि महागठबंधनमधील अंतर घटलं, बिहार निवडणुकीच्या निकालात जबरदस्त चुरस” date=”10/11/2020,6:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद लाईव्ह” date=”10/11/2020,6:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”NDA आणि महागठबंधनमधील अंतर घटलं” date=”10/11/2020,6:10PM” class=”svt-cd-green” ] NDA आणि महागठबंधनमधील अंतर घटलं, NDA 123 जागांवर आघाडी, तर महागठबंधनला 112 जागा [/svt-event]

[svt-event title=”अमित शाहा आणि नितीश कुमारांची फोनवरुन चर्चा” date=”10/11/2020,4:49PM” class=”svt-cd-green” ] गृहमंत्री अमित शाह आणि नितीश कुमार यांच्यात फोनवर चर्चा, निवडणुकीच्या निकालानंतर रणनितीसंदर्भात फोनवर चर्चा,  [/svt-event]

[svt-event title=”नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत – संजय राऊत” date=”10/11/2020,3:33PM” class=”svt-cd-green” ] नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत, कारण शब्द फिरवल्यावर काय होतं, हे शिवसेनेने दाखवून दिलंय – संजय राऊत

[/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय सत्ता विरोधात असतानाही उत्तम लढा : संजय राऊत” date=”10/11/2020,3:32PM” class=”svt-cd-green” ] पराभूत होणाऱ्या टीमच्या कप्तानाला नेतृत्वगुणांमुळे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरवले जाते, तीस वर्षांचा एकटा युवक, कुटुंब आणि मित्रपक्षाकडून पाठबळ नाही आणि केंद्रीय सत्ता विरोधात असतानाही उत्तम लढा [/svt-event]

[svt-event title=”नितीशबाबू तिसऱ्या क्रमांकावर, तेजस्वी यादव ‘मॅन ऑफ द मॅच’ ” date=”10/11/2020,3:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अमित शाह भाजप मुख्यालयात जाण्याची शक्यता” date=”10/11/2020,2:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारचा पहिला निकाल जाहीर” date=”10/11/2020,2:01PM” class=”svt-cd-green” ] बिहारचा पहिला निकाल जाहीर, दरभंगा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी घोषित, तब्बल सहा तासांनी पहिला निकाल हाती [/svt-event]

[svt-event title=”अद्याप 3 कोटी मतांची मोजणी बाकी – निवडणूक आयोग ” date=”10/11/2020,1:50PM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे मतदान केंद्रांच्या संख्या 63 हजारावरून 1.26 लाखांवर गेली आहे. बिहारमध्ये एकूण 4.10 कोटी मतदान झालं. त्यापैकी 25 टक्के मतांची म्हणजे 1 कोटी मतांची मोजणी करण्यात आली आहे. अजून 3 कोटी मतांची मोजणी बाकी आहे. एकूण 55 केंद्रांवर मोजणी सुरू असून अजून 19 ते 51 फेऱ्यांपर्यंत मोजणी होऊ शकते – निवडणूक आयोग [/svt-event]

[svt-event title=”बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण ” date=”10/11/2020,1:42PM” class=”svt-cd-green” ] बिहारमध्ये पोस्टल मतांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने निकाल यायला वेळ लागत आहे – निवडणूक आयोग [/svt-event]

[svt-event title=”मतमोजणी नेहमीच्या गतीनेच सुरु – निवडणूक आयोग ” date=”10/11/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ] मतमोजणी धीम्यागतीने सुरू नाही. नेहमीच्या गतीनेच मतमोजणी सुरू आहे. परंतु, यंदा कोरोनामुळे मतदान केंद्र वाढवावी लागली. त्यामुळे मशीनही वाढल्या. [/svt-event]

[svt-event title=”आतापर्यंत 25 टक्के मतांची मोजणी – निवडणूक आयोग” date=”10/11/2020,1:37PM” class=”svt-cd-green” ] बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीदरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 25 टक्के मतांची मोजणी झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद live” date=”10/11/2020,1:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अंतिम निकाल संध्याकाळी जाहीर होणार, आतापर्यंत फक्त 20 टक्के मतमोजणी” date=”10/11/2020,12:48PM” class=”svt-cd-green” ] अंतिम निकालासाठी संध्याकाळचे 7 वाजणार, आतापर्यंत फक्त 20 टक्के मतांचीच मोजणी, 4 कोटींपैकी फक्त 80 लाख मतांची मोजणी, 27 पैकी 6 फेऱ्यांचीच आतापर्यंत मोजणी, कोरोना प्रोटोकॉलमुळे विलंबाची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये NDA ची मुसंडी, महागठबंधन पिछाडीवर” date=”10/11/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ] ? एनडीए – 126

?महागठबंधन – 102

? BJP – 72

? RJD -63

?JDU – 47 [/svt-event]

[svt-event title=”एनडीएची आघाडी कायम, महागठबंधन पिछाडीवर ” date=”10/11/2020,11:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणूक निकालांचे अपडेट” date=”10/11/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ] ? एनडीए – 124

?महागठबंधन – 105

? BJP – 69

? RJD -70

?JDU – 47 [/svt-event]

[svt-event title=”कलांनुसार एनडीए बहुमताच्या आकड्यांपार” date=”10/11/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारचे बडे चेहरे” date=”10/11/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ]

?तेजस्वी यादव (राजद) – आघाडीवर

?तेज प्रताप यादव (राजद) – पिछाडीवर

?चंद्रिका राय (जेडायू) – आघाडीवर

?जीतनराम मांझी (हिंआमो)- पिछाडीवर

?पप्पू यादव (अपक्ष) – पिछाडीवर

?श्रेयसी सिंह (भाजप) – आघाडीवर

?लव सिन्हा (काँग्रेस) – पिछाडीवर

?पुष्पम प्रिया (टीपीपी) – पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये सबसे तेज तेजस्वी : संजय राऊत” date=”10/11/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महागठबंधन आणि एनडीए यांची कट-टू-कट लढाई ” date=”10/11/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार NDA ची अखेर शंभरी पार” date=”10/11/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहार विधानसभा निवडणुकीचे निकालाचे अपडेट” date=”10/11/2020,9:24AM” class=”svt-cd-green” ] बिहारमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार NDA ची अखेर शंभरी पार [/svt-event]

[svt-event title=”महागठबंधन बहुमताचा आकडा गाठण्याची चिन्हं” date=”10/11/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”RJD शंभर जागांवर आघाडीवर” date=”10/11/2020,8:59AM” class=”svt-cd-green” ] राजदची ‘सेंच्युरी’! राजद शंभर जागांवर आघाडीवर, महागठबंधन 116 जागांवर पुढे, तर एनडीएला 81 जागांवर आघाडी, भाजपला 47 जागांवर कल [/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट ” date=”10/11/2020,8:54AM” class=”svt-cd-green” ] ?महागठबंधन :100, ?एनडीए : 60 जागांवर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्रिपदाचे दावेदार तेजस्वी यादव राघोपुर मतदारसंघातून आघाडीवर ” date=”10/11/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट” date=”10/11/2020,8:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Bihar Election Result 2020 LIVE | #बिहारकुणाचे? महागठबंधनची घोडदौड” date=”10/11/2020,8:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महागठबंधनची सरशी” date=”10/11/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ] महागठबंधनची सरशी, 83 जागांवर आघाडीवर, बहुमतापासून 41 जागा दूर, राजद 72 जागांवर आघाडीवर, तर एनडीए 45 जागांवर पुढे

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांचे बिहारच्या निकालावर पहिले ट्विट” date=”10/11/2020,8:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणूक लाईव्ह अपडेट” date=”10/11/2020,8:34AM” class=”svt-cd-green” ] बिहार निवडणूक : महागठबंधन आघाडीवर, ?महागठबंधन :66 जागा, ?एनडीए : 34 जागा [/svt-event]

[svt-event title=”Bihar Election Result 2020 LIVE | #बिहारकुणाचे? 102 जागांचे कल हाती ” date=”10/11/2020,8:33AM” class=”svt-cd-green” ] ? एनडीए – 36 (भाजप – २३) ?महागठबंधन – 66 (RJD – ५९) [/svt-event]

[svt-event title=”महागठबंधनची घोडदौड, बहुमतासाठी 70 जागांची गरज ” date=”10/11/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] ? एनडीए – 28 ?महागठबंधन – 52 ?BJP – 17 ?RJD – 47 ?JDU – 10 [/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणूक लाईव्ह अपडेट” date=”10/11/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महागठबंधनची घोडदौड, BJP आणि RJD ची कांटे की टक्कर ” date=”10/11/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजप आणि राजदमध्ये जोरदार चुरस” date=”10/11/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आतापर्यंत 37 जागांचे कल हाती ” date=”10/11/2020,8:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये 28 जागांचे कल हाती” date=”10/11/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] 28 जागांचे कल हाती, भाजप 11 जागांवर आघाडीवर, तर राजदची 14 जागांवर सरशी, जेडीयू, काँग्रेस प्रत्येकी एक-एक जागेवर पुढे [/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणुकीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया” date=”10/11/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रीय जनता दलाचे नेते (राजद) तेजस्वी यादव यांचे नवे ट्वीट ” date=”10/11/2020,8:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात, पहिला कल भाजपला, 5 जागांवर आघाडीवर” date=”10/11/2020,8:10AM” class=”svt-cd-green” ] बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात, पहिला कल भाजपला, 5 जागांवर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती” date=”10/11/2020,8:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात ” date=”10/11/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणुकीच्या मतमोजणीचं काऊंटडाऊन सुरु, केवळ 12 मिनिटं शिल्लक” date=”10/11/2020,7:49AM” class=”svt-cd-green” ] बिहार निवडणुकीच्या मतमोजणीचा उत्साह शिगेला, काऊंटडाऊन सुरु, केवळ 12 मिनिटं शिल्लक [/svt-event]

[svt-event title=”बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर, सामनामधून तेजस्वी यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव” date=”10/11/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अनेक मंत्र्यांचे भवितव्य निश्चित होणार” date=”10/11/2020,7:15AM” class=”svt-cd-green” ] नंदकिशोर यादव (पाटणा साहिब), प्रमोद कुमार (मोतिहारी), राणा रणधीर (मधुबन), सुरेश शर्मा (मुजफ्फरपूर), श्रवण कुमार (नालंदा), जय कुमार सिंह (दिनारा) आणि कृष्णनंदन प्रसाद वर्मा (जहानाबाद) अशा अनेक मंत्र्यांचे भवितव्य आज निश्चित होणार आहे. (Bihar Election Result 2020 LIVE Updates) [/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मतमोजणी केंद्र ” date=”10/11/2020,7:13AM” class=”svt-cd-green” ] बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात तीन मतमोजणी केंद्रे तयार केली गेली आहेत. तीन मतमोजणी केंद्रे ही तुलनेने जास्त असून, काही विशेष जिल्ह्यांमध्येच त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व जिल्हा चंपारण (12 विधानसभा मतदारसंघ), गया (10 विधानसभा मतदारसंघ), सिवान (8 विधानसभा मतदारसंघ) आणि बेगूसराय (7 विधानसभा मतदारसंघ) अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. बिहारच्या इतर जिल्ह्यांत एक-दोन मतमोजणी केंद्रे सुरू केली आहेत. [/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला 8 वाजता सुरुवात ” date=”10/11/2020,7:12AM” class=”svt-cd-green” ] आज सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. राज्यातील 55 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. कोरोना पाहता मागील वेळेपेक्षा यावेळी अधिक मतमोजणी केंद्रे तयार केली गेली आहेत. बिहारमधील 38 जिल्ह्यांतील 55 मतमोजणी केंद्रे आणि 414 हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणूक निकाल लाईव्ह अपडेट एका क्लिकवर ” date=”10/11/2020,7:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

(Bihar Election Result 2020)

संबंधित व्हिडीओ :

(Bihar Election Result 2020 LIVE Updates)

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.