उत्तर प्रदेशची आतापासूनच तयारी, मोदी-योगी विरूद्ध ‘बहणजी’ ‘भाई’!

बसपा आणि एमआयएम हे दोन्ही राजकीय पक्ष आगामी 2022 मधील उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत दलित-मुस्लीम कार्ड खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशची आतापासूनच तयारी, मोदी-योगी विरूद्ध 'बहणजी' 'भाई'!
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 9:44 PM

लखनौ : बिहार विधानसभा निवडणुकीत बसपा प्रमुख मायावती आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली. यात काही मोठा बदल झालेला पाहायला मिळाला नसला तरी त्यांनी आपली दखल घ्यायला भाग पडेल इतक्या जागांवर विजय मिळवला. आता ही राजकीय पक्षांची जोडी आगामी 2022 मधील उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत दलित-मुस्लीम कार्ड खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. AIMIM ने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपासमोर मैत्रीचा पुढे केलाय. अशा स्थितीत मायावती यांनी ही मैत्रीची ऑफर स्वीकारल्यास उत्तर प्रदेशमधील राजकीय समीकरणं चांगलीच बदलण्याची शक्यता आहे (BSP Chief Mayavati and AIMIM chief Asaduddin Owaisi may alliance in upcoming UP Election).

बिहारमध्ये AIMIM ला मिळालेल्या यशानंतर आता त्यांचा पुढील प्रयत्न उत्तर प्रदेशमध्ये जनाधार वाढवण्यासाठी असेल. AIMIM ने विधानसभा निवडणूक पाहता आपल्या पक्षाच्या बांधणीवर जोर दिला आहे. मागील एका महिन्यात जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये नवे जिल्हा अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. याशिवाय एमआयएम पक्षात अनेक नव्या सदस्यांना जोडण्यासाठी अभियानही राबवण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अभियानाला वेग आलाय.

AIMIM चे उत्तर प्रदेश अध्यक्ष शौकत अली म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये ओवेसी-मायावती एकत्र येऊन धार्मिक शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखतील. याशिवाय एसपी, बीएसपी आणि काँग्रेस यापैकी एकटं कुणीही भाजपला पराभूत करु शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये दलित आणि मुस्लीम दोन्ही समुहांचे एकसारखेच प्रश्न आहेत. दोन्ही समुहांची लोकसंख्या देखील सारखीच आहे. आम्ही मागील निवडणुकीत देखील बसपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी ही युती होऊ शकली नव्हती. बिहार निवडणुकीत एक राजकीय प्रयोग झाला आहे. त्यामुळे हा प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये देखील राबवला पाहिजे.”

“उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 21 टक्के दलित आणि 20 टक्के मुस्लीम आहेत. अशात दलित मुस्लीम एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेऊ शकतात. आमचा पक्ष सुरुवातीपासूनच दलित मुस्लीम एकतेवर काम करत आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये हा प्रयोग राबवण्यात यश आलंय. बसपा देखील कुणाच्याही सोबत न जाता चांगलं यश मिळवण्याच्या स्थितीत नाही,” असंही शौकत अली यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

उत्तर प्रदेशमध्ये ‘सैराट’, मुलीला गोड बोलून माहेरी आणलं, नंतर गोळी झाडून हत्या, मृतदेह शेतात पुरला

बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का; गुलाबराव पाटलांचा योगींना टोला

’28 व्या क्रमांकावरील पिछाडीचं राज्य 5 व्या क्रमांकाच्या राज्याला शिकवतंय’, केसीआर यांचा आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

BSP Chief Mayavati and AIMIM chief Asaduddin Owaisi may alliance in upcoming UP Election

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.