AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का; गुलाबराव पाटलांचा योगींना टोला

उत्तरप्रदेशात दिवसाढवळ्या बँकेत दरोडे पडतात. मग तिथे गुंतवणूक करणे कितपत उचित आहे? | Gulabrao Patil

बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का; गुलाबराव पाटलांचा योगींना टोला
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Dec 02, 2020 | 6:35 PM
Share

मुंबई: उत्तर प्रदेशात मुंबईच्या तोडीस तोड फिल्ससिटी उभारण्याचे स्वप्न उराशी घेऊन चाचपणीसाठी मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील   यांनी टोला लगावला आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. मग कलाकार उत्तर प्रदेशात जाऊन काय डाकू बनणार आहेत का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उपस्थित केला. (Shivsena leader Gulabrao Patil slams UP CM Yogi Adityanath)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या तुलनेत मुंबई सुरक्षित असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात सुरक्षितता आहे का? उत्तरप्रदेशात दिवसाढवळ्या बँकेत दरोडे पडतात. मग तिथे गुंतवणूक करणे कितपत उचित आहे? त्यामुळे बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार का, याबाबत माझ्या मनात साशंकता असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपण मुंबईत काही हिसकावून घेण्यासाठी आलो नसल्याचे स्पष्ट केले. बॉलिवूड इंडस्ट्री (Bollywood) मुंबईबाहेर नेणं म्हणजे एखाद्याच्या खिशातलं पाकीट मारण्याइतकी सोपी गोष्ट आहे का, असा मिश्किल सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांना विचारला.

आम्हाला कोणाचीही गुंतवणूक पळवायची नाही किंवा कोणाच्याही विकासात अडथळा आणायचा नाही. आम्ही काहीही न्यायला आलेलो नाही. आम्हाला उत्तर प्रदेशात स्वतंत्र व्यवस्था उभारायची आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

‘बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काहीही घेऊन जायला आलो नाही’

आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

उत्तर प्रदेशात आम्हाला वर्ल्ड क्लास फिल्मसिटी निर्माण करायची आहे. म्हणून व्यक्तिगतरित्या मी अनेकांना भेटलो. काहींशी सामूहिकपणेही चर्चा केली. फिल्मी दुनियेकडूनही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका

(Shivsena leader Gulabrao Patil slams UP CM Yogi Adityanath)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...