Todays Gold Rate : उच्चांकापेक्षा सोने 55000 रुपयांपेक्षाही स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्याचे दर..
Todays Gold Rate : इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या भावात मोठी चढउतार बघायला मिळत आहे. आजचे सोन्याचे भाव पुढे आली आहेत. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा 50 हजारांपेक्षाही कमी आले आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका सराफा बाजारापेठेत बघायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा 50 हजारांपेक्षाही कमी आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर झाला. त्याचा थेटपणे परिणाम सोन्याच्या भावावर बघायला मिळाला. या युद्धात सोने आणि चांदीचे भाव अस्थिर झालीत. सतत चढउतार भावामध्ये बघायला मिळत आहे. सोने जवळपास दोन लाखांच्या आसपास गेले होते. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. या आठवड्यात 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात घट झाली. इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू आहे. युद्धसंधी लागू करण्यात आली. कोणत्याही प्रकारचा हल्ला केला जात नाही. होर्मुज खाडीत तणाव आहे. अमेरिकन डॉलरचे बळकटीकरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदार सावध होते. त्याचाच फटका सोन्याला बसत असल्याचे दिसत आहे.
या आठवड्यात सोन्याच्या भावात मोठी घट दिसून आली. आजचे सोन्याचे दर पुढे आली आहेत. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 1,51, 230 प्रति 10 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत प्रति 10 ग्रॅम 330 रूपयांनी वाढ सोन्याच्या दरात झालीये. 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 1, 38,500 प्रति 10 ग्रम आहे. 300 रूपयांची वाढ कालच्या तुलनेत झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,13,500 प्रति 10 ग्रॅम 250 ची वाढ नोंदवली गेली.
सोन्याचे भाव आजच्या घडीला त्याच्या उच्चांकापेक्षा 50 हजारांपेक्षाही कमी झाली आहेत. पुढील काही काळात युद्ध थांबले आणि युद्धविरामाची घोषणी तिन्ही देशांकडून करण्यात आली तर सोन्याच्या आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. सोन्याचे भाव पुन्हा गगणाला पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या युद्धात चर्चा सुरू झाली.
जर चर्चेतून कोणताच मार्ग निघाला नाही तर पुन्हा सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याचे संकेत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धापूर्वी सोने आणि चांदीचे भाव चांगलेच गगणाला पोहोचले होते. मात्र, युद्ध सुरू झाले आणि सोन्याचे दर घसरले. सतत सोन्याच्या भावात घसरण नोंदवली जात आहे. अनेकांकडून या दरम्यान सोन्याची खरेदीही केली जात आहे.