AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने महागले तशी वाढली तस्करी, या विमानतळावर 73 लाखांचे सोने टाकून आरोपी पसार

सोन्याचे दर गगनाला भिडल्याने आता विमानतळांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांद्वारा देशात कर चुकवून सोने आणण्याचे प्रमाण वाढले आहेत.

सोने महागले तशी वाढली तस्करी, या विमानतळावर 73 लाखांचे सोने टाकून आरोपी पसार
| Updated on: Oct 14, 2025 | 5:33 PM
Share

तिरुवनंतपुरम: सोन्याचे भाव जसे वाढले तसे सोन्याची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सोने शरीरात लपवून आणण्याचे प्रमाण वाढले आहे. केरळ विमानतळासह अनेक विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार घडत आहेत. सीमा शुल्क आणि महसूल संचालनालयाने ( DRI ) रविवारी तिरुवनंतपुरम आणि कोच्ची एअरपोर्टवर तस्करीचे सोने पकडले आहे. तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर उतरलेल्या एका प्रवाशाकडून ३६० ग्रॅम सोने जप्त केले आहे. तर कोच्चीच्या सीमा शुल्क आयुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करीचे प्रकार विमानतळावर वाढले आहेत. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याची तस्करी वाढली आहे.

सोने लपवण्यासाठी निरनिराळे प्रकार

सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर विविध घटनात १.६ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या प्रयत्नात दोन व्यक्तींनी अटक झाली आहे. तस्करी करणारे आपल्या शरीर वा कपड्यात सोने लपवण्याचे निरनिराळे प्रकार वापरत आहेत. सोन्याला मोती वा माणकांच्या हाराच्या रुपात लपवण्याचा प्रकार उघडकीस आले आहे. सीमाशुल्क विभाग सतर्क असून सोन्याच्या तस्करीवर अंकुश लावण्यासाठी विमानतळांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. तसेच सोन्याच्या तस्करीला रोखण्यासाठी महसूल संचालनालय देखील सर्तक झाले आहे.

जानेवारी ते जुलै दरम्यान ८७ प्रकरणं

कोच्ची एअरपोर्टवरील एका विमानात बेवारस अवस्थेत ६३० ग्रॅम सोने पडलेले आढळले असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमा शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान केरळात सोने तस्करीची ८७ केसेस दाखल झाल्या असून त्यात एकूण सुमारे ३२ कोटी रुपयांचे ४०.६ किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरुन घटवून सहा टक्के केल्यानंतर सोन्याच्या तस्करीत घट झाली होती. परंतू सोन्याच्या किंमत प्रचंड वाढल्याने सोन्याची तस्करी पुन्हा वाढली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की सध्याचे सोन्याच्या किंमतीतील वाढीमुळे सोन्याची तस्करीची प्रकरणे वाढली आहेत. सोन्याच्या दरात घट होताच सोन्याच्या तस्करीचे प्रमाण घटेल असेही हा अधिकारी म्हणाला. मुंबई विमानतळावर तर १२.५८ कोटींच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळाचे कर्मचारीही सामील झाल्याचे उघडकीस आले होते. तीन कर्मचाऱ्यांसह या प्रकरणात १३  जणांना अटक झाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...