सोने तस्करीत मुंबई विमानतळाचे कर्मचारीही सामील, 12.58 कोटीचे सोने जप्त, 13 जणांना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने ‘ऑपरेशन गोल्डन स्वीप’ मोहिम राबवून परदेशातून आलेले १२.५८ कोटींचे सोने हस्तगत केले आहे. या प्रकरणात एकूण १३ लोकांना अटक झाली असून त्यात एअरपोर्ट कर्मचारी आणि परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचे एक असे रॅकेट उद्धवस्त केले त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. डीआरआयने ‘ऑपरेशन गोल्डन स्वीप’ नावाने केलेल्या एका गुप्त कारवाईने एक आंतराष्ट्रीय सोने तस्करीचे रॅकेट उद्धवस्त नष्ट केले. ही टोळी विदेशी कॅरियरचा वापर करते तसेच एअरपोर्टच्या आतील कर्मचाऱ्यांची देखील मदत घेते असे उघड झाले आहे. डीआरआयने या कारवाईत १०.५ किलोचे परदेशातून आणलेले सोने पकडले आहे. याची किंमतच १२.५८ कोटी इतकी आहे. या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आले आहेत. यात दोन बांग्लादेश, सहा श्रीलंकन, दोन एअर पोर्टचे कर्मचारी, दोन हँडलर आणि एक मास्टरमाईंड यांचा समावेश आहे.या टोळीचे नेटवर्क मुंबई ते दुबईपर्यंत पसरलेले असून अनेक महिन्यांपासून हे तस्करी करत होते अशी माहिती उघडकीस आली आहे.
‘ऑपरेशन गोल्डन स्वीप’ कसे काम करते
तपासात ही तस्करीची गँग गुपचूपपद्धतीने मोठ्या चलाखीने काम करत होती. दुबई, सिंगापूर, बँकॉक आणि ढाका येथून येणाऱ्या ट्रान्झिट प्रवाशांचा वापर कॅरियर म्हणून केला जायचा. हे प्रवासी मेणापासून तयार केलेल्या अंडाकार कॅप्सुलमधून सोने आपल्या शरीरात लपवून आणायचे. मुंबई विमानतळावर उतरताच ते आंतरराष्ट्रीय डिपार्चर एरियातील सामील झालेल्या एअरपोर्ट कर्मचाऱ्यांकडे सोने सोपवत असायचे.
एअरपोर्ट स्टाफ तस्करांचे मदतगार
एअरपोर्टचा ‘मीट एण्ड ग्रीट’ सर्व्हीस स्टाफ या तस्करीत महत्वाची भूमिका निभावत असल्याचे DRI च्या तपासात उघडकीस आले. त्यांचे काम प्रवाशांकडून सोने घेऊन एअर पोर्टच्या बाहेर काढणे हे होते. या नंतर सोने हँडलर आणि रिसिव्हरपर्यंत पोहचवले जात होते. जे पुढे मास्टरमाईंडच्या संपर्कात असायचे. या नेटवर्कद्वारे कोट्यवधी रुपयांचे सोने भारतात अवैधपणे आणले जात होते.
DRI च्या तपासाने झाला भंडाफोड
या संपूर्ण ऑपरेशनला डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने गुप्तरित्या काम करीत उद्धवस्त केले. ही टोळी इनसायडर थ्रेट म्हणजे आतील लोकांना सामील करुन ही सोन्याची तस्करी आरामात करत होते. ज्यामुळे देशाच्या सुरक्षेलाच मोठा धोका निर्माण झाला होता. डीआरआय आता या नेटवर्कचे मनी ट्रेल आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास करत आहे.
