AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुडन्यूज, कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्टात सांगितले काय?

Modi Government on Cancer Medicines: कर्करोगावरील औषधं लवकरच स्वस्त होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारने एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात महत्त्वाचा निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. यामुळे आगामी काही दिवसात कॅन्सरवरील औषधांचा खर्च कमी होऊ शकतो.

गुडन्यूज, कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्टात सांगितले काय?
गुडन्यूज, कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय
| Updated on: Oct 23, 2026 | 10:46 AM
Share

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : कर्करोगावरील उपचार अत्यंत महागडे तर औषधांचाही खर्च अधिक आहे. कर्करोगग्रस्तांना आणि कुटुंबियांना मोदी सरकार दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सुप्रीम कोर्टात याविषयीची एक सुनावणी सुरू आहे. त्यात केंद्र सरकारने शपथपत्र दाखल केले आहे. त्यात औषधांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. इतकेच नाही तर सरकारच्या निर्णयामुळे औषधांच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

केंद्राचा कॅन्सरग्रस्तांसाठी मोठा निर्णय

कॅन्सरच्या महागड्या औषधांवरील ट्रेड मार्जिन ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची केंद्राने तयारी दाखवली आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. औषधांच्या किमती नियंत्रणासाठी तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. NPPA च्या ८ ऑक्टोबरच्या बैठकीत ३० टक्के ट्रेड मार्जिनच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती असून १० ते १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

नव्या व्यवस्थेमुळे कॅन्सरच्या औषधांच्या किमतीमध्ये २० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. औषधांवरील रुग्णांचा खर्च कमी होऊन उपलब्धता आणि किमतीतील पारदर्शकता वाढण्याची सरकारची अपेक्षा आहे. २०१९ मध्येही ४२ कॅन्सर औषधांवरील ट्रेड मार्जिन ३० टक्के करण्यात आले होते, ५२६ ब्रँडच्या किंमती कमी झाल्या होत्या. आता सरकार अजून एक मोठे पाऊल टाकणार आहे.

पंधरा दिवसात अहवाल

कॅन्सर रोगावरील औषधांच्या किंमतींवर प्रभावी नियंत्रणासाठी आणि भावात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. आरोग्य महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती येत्या १०-१५ दिवसात अहवाल सादर करेल. याविषयीचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणाची (NPPA) ८ ऑक्टोबर रोजी एक बैठक झाली. त्यात ३० टक्के ट्रेड मार्जिनच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

नफेखोरीला आळा

दरम्यान सरकारच्या ताज्या निर्णयामुळे कंपन्यांच्या नफेखोरीला आळा बसेल. कॅन्सरच्या महागड्या औषधांवरील ट्रेड मार्जिन ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची केंद्राने तयारी दाखवली आहे. यापूर्वी २०१९ मध्येही ४२ कॅन्सर औषधांवरील ट्रेड मार्जिन ३० टक्के करण्यात आले होते, ५२६ ब्रँडच्या किंमती कमी झाल्या होत्या. आताही औषधं स्वस्त झाल्यास रूग्णांच्या खिशावरील आर्थिक भार कमी होईल.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ