
रेल्वे स्थानकात ट्रेन उभी होती आणि अचानक पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. तर कोचमधून विचित्र वास येत होता.जेव्हा पोलिसांनी ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशाला विचारले की सिट खाली काय आहे ? तेव्हा त्यांनी सांगितले की काही नाही लोणचं आहे साहेब… परंतू जीआरपीचा ‘गुलाब’ तेथेच बसला आणि त्यानंतर सारा खेळच चौपट झाला ….
गुजरातच्या वडोदरा रेल्वे स्थानकातील ही घटना आहे. जीआरपीने झडती घेण्यासाठी ट्रेनमध्ये प्रवेश केला, तेव्हा विचित्र वास येत होता. जीआरपीच्या पथकाने ट्रेनमध्ये वास कसला येत आहे. म्हणून संशयाने पाहणी सुरु केली. लोणच्याची बरणी होती. मसाल्याच्या वासाने गुलाब थांबला असावा असा त्याच्या हॅण्डलरला वाटले. जीआरपीच्या गुलाबचा अखेर संशय खरा ठरला. पुढे जे समोर आले त्याने पोलिसांनाही धक्का बसला…
आमची जीआरपीची एसओजी टीमने काही महिन्यांपूर्वी पुरी-गांधीधाम एक्सप्रेसच्या एका कोचमधून लोणच्याच्या बरणीतून पॅक करुन पाच किलो गांजाची लपवलेली पाकिटे शोधली. ड्रग्स तस्करांनी डॉग स्क्वॉडच्या श्वानाची दीशाभूल करण्यासाठी मुद्दाम गांजावर लोणच्याच्या पिशव्या ठेवल्या होत्या. परंतू पोलिस श्वान ‘गुलाब’ याने लोणच्या खाली लपवलेल्या गांजाच्या वास ओळखला आणि तस्करांचा भंडाफोड केल्याचे पश्चिम रेल्वेच्या वडोदरा पोलिस अधिक्षक सरोज कुमारी यांनी सांगितले. या मोहिमेमुळे या गुलाबचे हॅण्डलर दीपेश सुर्वे यांनाही आश्चर्य वाटले होते. या लॅब्रोडॉर जातीच्या युवा श्वान गुलाबने साल २०२३च्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या समारंभात राज्य सरकारच्या अंमलीपदार्थांना ओळखण्याच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट श्वानाचा पुरस्कार पटकावला आहे.
दो दिन दिवसांपूर्वी, गुलाबने काकीनाडा – भावनगर एक्सप्रेसमध्ये एका सीट खाली गांजा पकडला होता. रेल्वेची एसओजी टीमने नियमित तपासणी करीत होती. तेव्हा गुलाबने या अवैध सामुग्रीला वासाने ओळखले. एसपी सरोज कुमारी म्हणाल्या की गुलाब बॅगेचा वास घेत राहिला आणि त्याच्या जवळ जाऊन भुंकू लागला. पोलिसांनी बॅग उघडली तर आता ८० हजार रुपये किंमतीचा गांजाची पाकिटे होती. परंतू ड्रग्ज तस्कर नाहीसे झाले होते. आम्ही तो माल जप्त केला आणि वडोदरा रेल्वे पोलीस ठाण्यात एनडीपीएस एक्ट अंतर्गत एफआरआय दाखल केला. एसपी सरोज कुमारी यांनी गुलाब आणि त्याचे हॅण्डलर दीपेश सुर्वे यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.
गुलाब जेव्हा पिल्लु होते तेव्हापासूनच हे अत्यंत हुशार श्वान आहे. गुलाबला साल २०२३ मध्ये बोटाडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात अंमलीपदार्थांच्या ओळखण्याबद्दल सर्वोत्कृष्ठ पोलीस श्वानाचा पुरस्कार मिळाला आहे. कारण त्याने असाधारण कौशल्य दाखवत अंमली पदार्थ हुडकून काढले आहेत. गुलाब ऊर्जावान असला तरी थोडा मुडी आहे. त्याला जास्त कामाचा दबाव पसंद नाही. गुलाब ड्रग्सचा ओळखल्यानंतर कामावर परत यायच्या ऐवजी आराम करतो. मला त्याला सक्रीय करण्यासाठी त्याचे लाड आणि त्याला खूप प्रेम करावे लागते तेव्हाच तो पुन्हा ड्यूटीवर हजर होतो असे सुर्वे सांगतात.