AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने केला मोठा बदल, संघाला मिळाली नवी ओळख

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. कारण मार्च महिन्यात आयपीएलचं 19वं पर्व सुरू होणार आहे. जेतेपदासाठी जोरदार लढती पाहायला मिळतील यात काही शंका नाही. असं असातना लखनौ सुपर जायंट्सने एक बदल केला आहे.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने केला मोठा बदल, संघाला मिळाली नवी ओळख
IPL 2026 स्पर्धेपूर्वी लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने केला मोठा बदल, संघाला मिळाली नवी ओळखImage Credit source: PTI
| Updated on: Feb 24, 2026 | 6:47 PM
Share

आयपीएल 2026 अर्थात या स्पर्धेच्या 19व्या पर्वाला मार्च महिन्यात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना वेळापत्रक जाहीर होईल. या पर्वात जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता असणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न होतं. ते मागच्या पर्वात पूर्ण झालं आहे. आता इतर फ्रेंचायझींचं लक्षही पहिल्या जेतेपदाकडे असणार आहे. लखनौ सुपर जायंट्स त्यापैकी एक फ्रेंचायझी आहे. या फ्रेंचायझीला अद्याप एकही जेतेपद मिळालेलं नाही. पण ही फ्रेंचायझी या ना त्या कारणाने चर्चेत असते. आयपीएल स्पर्धेत सर्वात महागडी बोली लावून ऋषभ पंतला आपल्या संघात घेतलं आहे. तसेच त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे. पण मागच्या पर्वात पदरी निराशा पडली. पण आता पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने आपला नवा लोगो जाहीर केला आहे.

ऋषभ पंतच्या नेतृत्वातील आयपीएल फ्रेंचायझीने आपला लोगो बदलत नवी ओळख तयार करण्यासाठी पाऊल पुढे टाकलं आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू मैदानात उतरतील तेव्हा त्याच्या जर्सीवर नवा लोगो असेल. या लोगोची एक खासियत आहे. यापूर्वी लोगोमध्ये फक्त गरूड होता. आता नव्या लोगोमध्ये गरूडासोबत हत्तीही दिसणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने हा लोगो व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसमोर प्रदर्शित केला आहे. व्हिडीओनुसार, सृष्टीची सुरुवात उर्जेपासून झाली आणि त्या उर्जेपासून, आकाशाचा स्वामी गरुडाचा जन्म झाला. गरुडाच्या तेजातून शक्तीचा स्वामी हत्ती जन्माला आला. जेव्हा पृथ्वी आणि आकाश एकत्र येते तेव्हा एक नवीन वारसा जन्माला येतो लखनऊ सुपर जायंट्स.

लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर नवीन लोगो शेअर केला आणि लिहिले, “इथे जोश आहे, वादळ आहे. लखनौ सुपर जायंट्ससाठी ही एक नवीन उड्डाण आहे.” लखनौ सुपर जायंट्सने 2022 पासून आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं आहे. यंदाचं पाचवं पर्व असून मागच्या चार पर्वात हाती काहीच लागलेलं नाही. 2022 आणि 2023 मध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं पण जेतेपद काही मिळालं नाही. तर 2024 आणि 2025 मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतच नव्हते. दहा आयपीएल संघांपैकी लखनौ हा एकमेक संघ असा आहे की त्या फ्रेंचायझीने अंतिम फेरी गाठलेली नाही.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ