“भाजपचे मनपासून धन्यवाद…”, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नवीन आंदोलनापूर्वी राहुल गांधी म्हणाले काय?
Rahul Gandhi Thank You BJP : रामलिला मैदानावर इंडिया आघाडीने पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे एक ट्वीट चर्चेत आले आहे. त्यांनी भाजप आणि साथीदारांचे मनापासून आभार मानले आहेत.

India Bloc agitation Ramlia Maidan: इंडिया आघाडीने पुन्हा एकदा राजधानी दिल्ली दणाणून सोडण्याचा संकल्प केला आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक रामलिला मैदानावर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जंतरमंतर हे आंदोलनाचे स्थळ नसेल. तर रामलिला मैदानावर एसआयआर, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एल्गार पुकारला जाणार आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी भाजप आणि संघ परिवाराला एक उपरोधिक टोला लगावला आहे.
राहुल गांधी म्हणाले काय?
1 नोव्हेंबर रोजी होणार्या आंदोलनाच्या अगोदर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपला उपरोधिक टोला लगावला आहे. राहुल गांधी म्हणाले की, मी भाजपचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी आमच्या विचारसरणीला देशाच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे काम अगदी मोफत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे अत्यंत आक्रमक आंदोलन करत आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये नव संजीवनी आणण्यास सुरुवात केली आहे. संघटनात्मक स्तरावरही मोठा बदल केला आहे. तर आता रस्त्यावरच्या लढ्यातही मोठे नेते उतरत असल्याने मोठ्या बदलाला सुरुवात झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे.
आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू
इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह समविचारी संस्थांवर हल्लाबोल केला. भाजप आमच्यावर कितीही टीका करो. आवाज दाबण्याचा प्रयत्न करो. आम्ही आमची विचारसरणी आणखी वेगाने जनतेपर्यंत पोहचवू. तुम्ही आमच्या विचाराला, विचारसरणीला जितका विरोध कराल, तितकेच लोक आमच्याशी जोडले जातील, असे त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. कितीही दबावाचे राजकारण केले तरी आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू असे त्यांनी ठणकावले.
हमारा वोट चुराया जा रहा है और ये हम किसी हाल में चुपचाप नहीं सहेंगे।
मतदाता सूचियों से नाम काटे गए। नियम-कानून तोड़े गए। और सवाल पूछने वालों पर लाठियां चलीं।
अब जवाब देश देगा।
1 नवंबर – चलो दिल्ली। वोट बचाओ – देश बचाओ जन मार्च और महारैली।
छात्र, किसान, मज़दूर, महिलाएं, नौजवान और व्यापारी – जिस-जिस को लोकतंत्र की फ़िक्र है, वो ज़रूर आए।
वोट आपका है। लड़ाई भी आपकी है।
📍 रामलीला मैदान, नई दिल्ली
PS: BJP और उसके साथियों का दिल से धन्यवाद, जो इस कार्यक्रम का इतना ज़ोर-शोर से प्रचार कर रहे हैं और इसे ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचा रहे हैं।
बस अगले 7 दिन भी यही जोश और लगन बनाए रखिए!
#ChaloDilli #RamlilaMarch
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2026
बैठकीत सरकारविरोधात मोठी रणनीती
इंडिया आघाडीच्या या बैठकीत इतर महत्त्वाच्या नेत्यांनीही सरकारविरोधात सूर आळवला. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर या मुद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. घटक पक्षांनी राज्य घटना आणि लोकशाही धोक्यात आल्याचे म्हटले. आगामी काळात सर्वच पक्षांनी एकत्र येत दडपशाहीविरोधात आवाज उठवण्याचा नारा दिला.
