करोडपती लोक देश सोडून का जात आहेत?, यंदा तब्बल 4,300 करोडपती भारत सोडण्याची भीती

जगभरात आता भारतीयांचा दबदबा आहे. अमेरिकेतील बहुतांशी बड्या आयटी कंपन्यांच्या सीईओपदावर भारतीय व्यक्तींचा दबदबा निर्माण झाला आहे. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 प्रमाणे भारतातील स्थलांतरीत श्रीमंत व्यक्तीचे प्रमाण वाढले आहे.

करोडपती लोक देश सोडून का जात आहेत?, यंदा तब्बल 4,300 करोडपती भारत सोडण्याची भीती
Henley Private Wealth Migration Report 2024
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 20, 2024 | 9:42 AM

भारतातून कोट्यधीश मंडळींचे परदेशात स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मंडळी चांगल्या संधीची वाट पाहात असतात. आपल्या देशात शिक्षणाची चांगली संधी नाही, स्वत:ची चांगली प्रगती करण्याची संधी नाही की डॉलरमध्ये मिळणाऱ्या पगाराचे आकर्षण याबाबी उच्च मध्यमवर्गीयांना परदेशात नागरिकत्व घेण्यास खुणावत आल्या आहेत. परंतू जे भारतातच कोट्यधीश झाले आहेत असे चांगले सधन लोकही आता भारत सोडून चालले आहेत. असे नेहमी म्हटले जाते की जगात दर सात स्थलांतरीत हा भारतीय असतो. किंवा प्रत्येक मोठ्या देशात एक भारत वसलेला असतो. परंतू हेनेली एण्ड पार्टनर्सच्या या संस्थेच्या 2023 च्या आर्थिक वर्षांच्या मायग्रेशन अहवालाप्रमाणे भारतातून 5,100 करोडपतींनी आपला गाशा गुंडाळला आहे. तर यंदा 4,300 करोडपती देश सोडतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतातून परदेशात ब्रेन ड्रेन होत आले आहे. जगातील प्रत्येक मोठ्या आयटी कंपनीच्या सीईओपदी आता भारतीय वंशांच्या व्यक्तींचा दबदबा बनला आहे. हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा