AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीचा सण महाराष्ट्र, बिहार ते कर्नाटक, या खास पदार्थांनी होतो साजरा

आपल्या देशात विविधतेतही एकता असते. होळीचा सण देशात सर्व राज्यात साजरा केला जातो. परंतू या राज्यात होळीला विविध प्रकारचे खाद्य पदार्थ देखील तयार केले जातात. या पांरपारिक पदार्थांची माहिती घेऊयात...

होळीचा सण महाराष्ट्र, बिहार ते कर्नाटक, या खास पदार्थांनी होतो साजरा
Holi 2026:
| Updated on: Mar 01, 2026 | 7:10 PM
Share

होळीच्या सण हा रंगचा सण असला तरी या सणाच्या निमित्ताने भारतात विविध खाद्य पदार्थ तयार केले जातात. या दिवसासाठी घरा-घरात विविध पदार्थ बनवले जातात. परंपारिक मिठाईत सर्वाच्या तोंडी गुजियाचे नाव येते. गुजिया अनेक घरात होळीसाठी तयार केली जाते. विविध राज्यात होळीच्या दिवशी गुजिया शिवाय इतरही काही पारंपारिक मिठाई तयार केल्या जातात. बिहार ते कर्नाटकात कोणते पदार्थ तयार केले जातात ते पाहूयात..

रंगाच्या सणात गुजियाच्या गोडपणा जिभेवर रेंगाळतो, महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार ते कर्नाटकात विविध मिठाई तयार केल्या जातात. याचा स्वाद वेगवेगळा असतो. यंदा २ मार्च रोजी होलिका दहन आहे तर ३ मार्च रोजी रंगपंचमीचा सण आहे. यावेळी विविध राज्यातील घरात तयार करणाऱ्या मिठाई आणि पक्वानांची यादी आपण पाहूयात.

महाराष्ट्रात पुरण पोळी

होळीच्या निमित्त महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीची पुरण पोळी तयार केली जाते. होळीचा सण पुरणपोळी आणि आमटी शिवाय अपूर्ण मानला जातो. या गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठाला मळून त्याच चण्याची डाळ उकडून त्यात गुळ मिस्क करुन याचे पुरण तयार केले जाते. आणि हे पुरण पिठाच्या पोळ्यात भरुन तव्यावर त्या पराठ्या सारख्या भाजल्या जातात. यावेळी कटाची आमटी तयार केली जाते. गुळाच्या गुळवणी सोबत किंवा दूधासोबत कुस्करुन खाली जाते.

बिहार आणि मध्यप्रदेशात काय असते

होळीमध्ये मध्य प्रदेशात मालपुआ तयार केला जातो. बिहारात देखील याच्या शिवाय सण अपूर्ण मानला जातो. साखरेच्या पाकात बुडालेला सॉफ्ट मालपुआ तोंडात जाऊन जिभेवर असा विरघळतो की कल्पना करुनच तोंडा पाणी सुटते. मैदा, दूध आणि इलायची पासून तयार पदार्थाला आधी तळले जाते आणि त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवले जाते. अनेक जागी यास रबडी सोबत वाढले जाते. हे कॉम्बिनेशन खूपच टेस्टी आहे. बिहारात होळीत अनारसे देखील तयार करतात.

गोव्याची मिठाई नेऊरियोस

गोवा पर्यटकांना आवडणारे स्थळ असून येथे मिश्र संस्कृती पाश्चात्य लोकांकडून प्रेरणा घेणारी आहे.होळीला येथे नेऊरियोस किंवा नेवरिस पदार्थ तयार केला जातो. हा गुजिया सारखा गोड पदार्थ असून त्यात नारळ, गुळ आणि काजूची स्टफिंग असते.

कर्नाटकातील होलिगे वा ओबट्टू

कर्नाटकात होलीच्या दिवशी पारंपारिक मिठाई ( गोड पोळी ) होलिगे वा ओबट्टू तयार केली जाते. हा प्रकार पुरणपोळी सारखा असतो. कारण यात देखील चण्याची डाळ आणि गुळाची स्टफिंग असते. यास आंध्रप्रदेशात बोबटलू नावाने ओळखले जाते.

हरियाणात होळीचा खास पदार्थ

होळीच्या निमित्ताने हरियाणात देखील गुजिया तयार केली जाते. येथे अनेक घरात गोड भात तयार केला जातो. ज्यात केसरचा वापर केला जातो. येथे गुलगुले तयार केले जातात.चुरमा देखील येथील पारंपारिक गोड पदार्थ तयार केला जातो.

बंगालमधील खास मिठाई

होळीच्या सणाला बंगालमध्ये डोल जात्रा नावाने ओळखले जाते. येथे दूधापासून पारंपारिक पदार्थ तयार केले जाते. येथेही मालपुआ तयार केला जातो. परंतू याची रेसिपी वेगळी आहे.याशिवाय भापा दोई, संदेश, मिष्टी दोई सारख्या जिभेवर चवी रेंगाळणारे पदार्थ तयार केले जातात.

Follow Us
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल.
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत.