मोठी बातमी! पुन्हा एका विमानाचा भीषण अपघात, उड्डाण करताच कोसळलं, धुराचे लोट अन् प्रचंड आवाज..

गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये विमान अपघाताच्या घटना सुरूच आहेत. आता आणखी एका विमानाचा अपघात झाला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही वेळेतच हे विमान कोसळलं आहे.

मोठी बातमी! पुन्हा एका विमानाचा भीषण अपघात, उड्डाण करताच कोसळलं, धुराचे लोट अन् प्रचंड आवाज..
Plane crash
Image Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Jun 29, 2026 | 7:08 PM

उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर आली आहे, विमानाचा भीषण अपघात झाला आहे, प्रशिक्षणार्थी विमान जमिनीवर कोसळलं आहे. या घटनेत एक ट्रेनी महिला पायलट जखमी झाली आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच तातडीने स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या पायलटला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी आगरा येथे हलवण्यात आलं आहे.दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, ही दुर्घटना घडल्यानंतर आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून विमान अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील कासगंजमध्ये हा अपघात घडला आहे, जेव्हा हा अपघात घडला, तेव्हा घटनास्थळी प्रचंड धुराळा उडाला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या विमानामध्ये एक ट्रेनी पायलट होती, तिने विमानाचं उड्डाण केलं मात्र त्यानंतर काही वेळातच शहरातील पोलीस लाईनच्या पाठिमागे असलेल्या लेन हायवेवर हे विमान कोसळलं. हे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे घटनास्थळी मोठा आवाज झाला, हा आवाज नेमका कशाचा होता, हे पाहाण्यासाठी स्थानिक लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा विमानाचा अपघात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

या अपघातामध्ये ट्रेनी महिला पायलट गंभीर जखमी झाली आहे. विमानाचा अपघात घडताच स्थानिक लोकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली, या ट्रेनी पायलटला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली, घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि बचाव पथक देखील घटनास्थळी हजर झालं. ही घटना नेमकी कशामुळे झाली, अपघाताचं नेमकं कारण काय होतं हे अजूनही समोर आलेलं नाहीये, विमान अपघाताच्या कारणाचा शोध सुरू असल्याची माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली आहे. ट्रेनी पायलटने विमानाचं उड्डाण केलं आणि त्यानंतर अवघ्या काही वेळेतच हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कुठलीही जिवीन हानी झाली नसली तरी विमानाचं प्रचंड नुकसान झालं आहे.

 

Follow Us