कोणी 10 वी तर कोणी 12 वी पास, मग भारतीय क्रिकेटर एवढी फाड फाड इंग्रजी कसे बोलतात, टॉप सीक्रेट समोर
भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळणारे काही खेळाडू असे आहेत की त्यांनी पदवीपर्यंत देखील आपलं शिक्षण पूर्ण केलेलं नाहीये. शिक्षण कमी असलं तरी देखील हे खेळाडू खूप चांगली इंग्रजी बोलतात, त्याचं सीक्रेट आता पहिल्यांदाच समोर आलं आहे.

भारतामध्ये क्रिकेट हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. असं म्हटलं जातं की भारतामध्ये जेवढे क्रिकेटचे फॅन आहेत, तेवढे फॅन जगाच्या पाठिवर कोणत्याच देशामध्ये नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत किक्रेट बोर्ड आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट खेळाडूंना इतर देशातील क्रिकेट खेळाडूंच्या तुलनेत प्रचंड पैसा मिळतो. खेळाडूंवर बीसीसीआयकडून पैशांचा वर्षाव होतो. त्यामुळे देखील अनेकजण क्रिकेटकडे आकर्षित होतात. भारतामध्ये क्रिकेटला मोठं भविष्य असून, अनेकजण करिअर म्हणून या खेळाची निवड करतात. त्यासाठी लहानपणापासूनच प्रचंड कष्ट करतात. मात्र यातील सर्वांची राष्ट्रीय संघात निवड होतेच असं नाही. यातील मोजक्या खेळाडूंनाच भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यात यश येतं, आता आपला मुख्य मुद्दा हा आहे की, भारतीय क्रिकेट संघात निवड झालेले क्रिकेटर एवढी उत्तम इंग्रजी कशी बोलतात?
भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटर असे आहेत, ज्यांचं शिक्षण हे फारच कमी झालेलं आहे. काही तर फक्त दहावी आणि बारावीच पास आहेत. मात्र तरी देखील ते उत्तम इंग्रजी बोलतात. सुरुवातीला हे खेळाडू इंग्रजी बोलताना अडखळतात, मात्र त्यानंतर ते सरावाने अस्खलित इंग्रजी बोलू लागतात. त्यामागे नेमकं काय कारणं असावं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर आपल्या खेळाडूंच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी वेळोवेळी टीम इंडियामधील खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड BCCI कडून प्रशिक्षण वर्गांचं आयोजन करण्यात येतं. या प्रशिक्षण वर्गावर लाखो रुपयांचा खर्च केला जातो, या प्रशिक्षण वर्गामध्ये या खेळाडूंना इंग्रजी बोलण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे त्यांना इंग्रजी बोलण्याची सवय होते.
एका रिपोर्टनुसार भारताचा माजी कर्णधार महिंद्रसंग धोनी देखील सुरुवातीला इंग्रजी बोलताना अडखळायचा मात्र जेव्हा त्याचे सहकारी इंग्रजी बोलायचे, इंग्रजीमधून संवाद साधायचे तेव्हा तो ते लक्षपूर्वक ऐकायचा, त्यानंतर त्याला देखील इंग्रजी बोलण्याची सवय झाली. आता तो उत्तम इंग्रजी बोलतो. एवढंच नाही तर हरभजन सिंग, हार्दिक पांड्या यांना देखील इंग्रजी बोलण्यास अडचण होती, मात्र आपल्या सहकाऱ्याचं बोलणं ऐकून ऐकून आणि सरावानंतर ते उत्तम इंग्रजी बोलू लागले.